Next
आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांचा संभाजी उद्यानात ‘आर्टिस्टिक कॉर्नर’
टाकाऊ वस्तूंपासून उद्यानात निर्माण केला कलात्मक कोपरा
प्रेस रिलीज
Tuesday, December 18, 2018 | 01:09 PM
15 0 0
Share this article:पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बर्नार्ड वॅन लिअर फाउंडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने संभाजी उद्यानात टाकाऊ वस्तूंपासून ‘आर्टिस्टिक कॉर्नर’ तयार केला आहे. पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना डोळ्यासमोर ठेऊन निर्माण केलेला हा कोपरा अतिशय कलात्मक आहे.

आर्किटेक्ट कॉलेजच्या बी-आर्क अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वाहनांचे जुने टायर, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरून अनेक कलात्मक गोष्टी उद्यानाच्या कोपऱ्यात तयार केल्या आहेत. रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचा उपयोग करून झाडांना संरक्षणाचा पार तयार करण्यात आला आहे. वाहनांच्या जुन्या टायरपासून लांब सापाचे कुंपण, खेळण्यासाठी टायरची जंगल जीम तयार करण्यात आली आहे; तसेच पुण्याची शिवकालापासून मेट्रोपर्यंत प्रगती दाखविणारी ग्राफिटी वॉल रंगविण्यात आली आहे.

प्राचार्य लीना देबनाथ, प्रा. अमीर पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘अर्बन-९५’ अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

(Please click here to read this news in English.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search