Next
‘नकळत सारे घडले’मध्ये स्वानंद किरकिरेंची हजेरी
प्रेस रिलीज
Wednesday, July 25 | 02:04 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत नुकतीच एका खास पाहुण्याने हजेरी लावली. हा पाहुणा होता सुप्रसिद्ध गायक-संगीतकार स्वानंद किरकिरे. अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल्या ‘चुंबक’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्वानंद किरकिरे यांनी ‘नकळत सारे घडले’च्या सेटवर आले होते.

‘नकळत सारे घडले’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी ७.३० वाजत दाखविली जाते. ‘चुंबक’ या सिनेमात किरकिरे प्रसन्ना ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. हाच प्रसन्ना आणि मालिकेतल्या प्रिन्स दादाची योगायोगाने भेट होते. त्यांच्यात गप्पाही होतात. झटपट पैसा कमावण्याच्या नादात कसे नुकसान होते याचे धडेच प्रसन्ना प्रिन्सदादाला देतो. त्यामुळे प्रिन्स दादाचे डोळेच उघडतात. आपल्या अफलातून अभिनयाने किरकिरेंनी ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील प्रसंग रंगवला आहे. त्यामुळे हा भाग नक्कीच मनोरंजक होणार आहे.

‘स्वानंदजींसोबत काम करण्याचे स्वप्न ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाके आहे. सीनपूर्वी खूप दडपण होते; मात्र स्वानंदजींनी मला खूप धीर दिला आणि सीन सहजरित्या पार पडला,’ अशी भावना प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या आशिष गाडेने व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link