Next
मुलांचे रंजन केंद्र चालवण्याचे प्रशिक्षण शिबीर
BOI
Thursday, February 07, 2019 | 05:11 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘गरवारे बालभवन’सारखी रंजन केंद्र चालवण्यात अथवा सुरू करण्यात रस असणाऱ्यांसाठी ‘गरवारे बालभवन’तर्फे १५ दिवसांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

१६ फेब्रुवारी ते दोन मार्च या काळात दररोज दुपारी एक ते संध्याकाळी सहा या वेळेत हा प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. शहरातील सारस बागेसमोर असलेल्या ‘गरवारे बालभवन’तर्फे पालक, कार्यकर्ते, शिक्षक, आजी-आजोबा अशा सर्व वयोगटातील इच्छुकांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे.  

या प्रशिक्षण शिबीरात मुलांचे मानसशास्त्र, आहार, नाट्यशिक्षण, व्यायाम, खेळ, चित्रकला, हस्तकला, गोष्टी, गाणी, अभिनय, मुलांचे प्रश्न यांसाठीचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकांसहित केले जाणार आहे. 

नावनोंदणीसाठी संपर्क :
गरवारे बालभवन, सारसबागेसमोर, पुणे
संपर्क क्रमांक : ०२० २४४४२१०९
वेळ : सायंकाळी चार ते साडे सहा
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search