Next
क्रिप्टोजॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ
प्रेस रिलीज
Wednesday, June 27, 2018 | 03:38 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : सायबर हल्ल्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, जानेवारीपासून मे २०१८ पर्यंत ३० लाखांहून अधिक हिट्ससह क्रिप्टोजॅकिंग रॅन्समवेअरला वैकल्पिक पर्यायाच्या स्वरूपात उदयास येत आहे. याबाबत प्रसिद्ध आयटी सिक्युरिटी सोल्युशन्स प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीस लिमिटेडने लोकांना सतर्क केले आहे.  

क्रिप्टोजॅकिंगमध्ये हॅकर संक्रमित सिस्टमच्या प्रॉसेसिंग पॉवरला हायजॅक करून क्रिप्टोकरंसी हस्तगत करतात. क्रिप्टोजॅकिंगचे प्रकार वाढत आहेत. अत्याधुनिक क्विक हील सिक्युरिटी लॅब्समधून प्राप्त माहितीनुसार जानेवारी ते मे २०१८ दरम्यान ३० लाख क्रिप्टोजॅकिंग हिट्स झाले आहेत. क्रिप्टोजॅकिंग हॅकर्समध्ये लोकप्रिय होत आहे. हे हॅकर बेकायदेशीररित्या आणि शिताफीने क्रिप्टोकरन्सीचे खनन करत आहेत.

क्रिप्टोजॅकिंगपासून मोबाइल यूझर्स देखील सुरक्षित नाहीत. मोबाइल क्रिप्टोजॅकिंग मालवेअर व्हेरिएंट मे २०१७मध्ये आठ होते, जे मे २०१८पर्यंत वाढून २५ झाले आहेत. क्विक हील सिक्युरिटी लॅबच्या अंदाजानुसार हा आकडा आणखी वाढणार आहे. कारण सायबर गुन्हेगारांसाठी क्रिप्टोजॅकिंग हा बेकायदेशीररित्या पैसे कामावण्याचा एक अत्यंत आकर्षक प्रकार आहे.            

क्विक हीलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय काटकर म्हणाले, ‘क्रिप्टोजॅकिंग रॅन्समवेअरपेक्षा अधिक किफायती आणि सक्षम पर्याय म्हणून पुढे आला आहे. रॅन्समवेअर हल्ल्यात या गोष्टीची खात्री नसते की, हॅकरला खंडणी दिलीच जाईल. क्रिप्टोजॅकिंग हॅकर्सना अशी सोय करून देते की, ते संक्रमित कम्प्युटरचा वापर करून जलद आणि खात्रीलायकरित्या आर्थिक लाभ मिळवू शकतात. अद्याप क्रिप्टोजॅकिंग  हल्ल्यांमुळे डेटाचे नुकसान झाल्याची एकही बातमी आलेली नाही.’

रॅन्समवेअरच्या विपरीत क्रिप्टोजॅकिंग हल्ल्याचा पत्ता लागत नाही, ज्यामुळे हल्लेखोर तुमच्या काँप्युटरचा उपयोग करून हवा तितका वेळ क्रिप्टोजॅकिंग हस्तगत करण्याचे काम चालू ठेवू शकतो. रॅन्समवेअरच्या हल्ल्यापेक्षा हे सोपे आहे. याचा आणखी एक सामान्यपणे वापरला जाणारा प्रकार म्हणजे, वेबसाइट आणि पॉप-अप जाहिरातींना जावा स्क्रिप्ट आधारित क्रिप्टोमायनिंग स्क्रिप्टने संक्रमित केले जाते आणि जेव्हा युजर या संक्रमित वेबसाइटला भेट देतो किंवा संक्रमित जाहिरातींवर क्लिक करतो, तेव्हा ही स्क्रिप्ट सक्रिय होते. क्रिप्टोजॅकिंग हल्ले खास करून व्यक्तीगत काँप्युटरवर होतात; परंतु ‘क्विक हील’च्या अनुमाननुसार नजीकच्या काळात क्लाउड आधारित सेवांना देखील लक्ष्य बनविण्यात येईल.

क्रिप्टोजॅकिंगचे प्रमुख आणि सहज ओळखता येणारे लक्षण म्हणजे सिस्टमचा परफॉर्मन्स. काँप्युटरची बहुतांशी शक्ती क्रिप्टोमायनिंगमध्ये खर्च होऊ लागते व त्यामुळे सिस्टमचा परफॉर्मन्स खूप खराब होतो. बऱ्याचदा क्रिप्टोजॅकिंग यूजर्सना आपल्या सिस्टमवर कोणतेही कामच करू देत नाहीत व सिस्टम वरचेवर क्रॅश होऊ लागते. आणखी एक लक्षण म्हणजे पीसी किंवा लॅपटॉपच्या पंख्याची गती असामान्यरित्या वाढणे किंवा मोबाइल फोनमधील बॅटरी खूप गरम होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search