Next
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी
BOI
Monday, June 10, 2019 | 03:49 PM
15 0 0
Share this article:

प्रमोद देसाई यांच्या जागेत बांधलेल्या टाकीची पाहणी करताना उल्हास परांजपे (डावीकडून पहिले) आणि गजेंद्र पौनीकर (उजवीकडे)

गुहागर : तालुक्यातील १४ गावांत जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बांधलेल्या २५ टाक्यांमध्ये पावसाचे सुमारे तीन लाख लिटर पाणी साठणार आहे. फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने सर्वाधिक टाक्या बांधणारा गुहागर हा रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला आहे. 

हेदवी येथील प्रमोद देसाई यांच्या कातळावरील जागेत फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने १८ हजार लिटर क्षमतेची ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची टाकी नुकतीच बांधण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनीच म्हणजे पाच जूनला या टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या वेळी ‘जलवर्धिनी’चे विश्वस्त परांजपे यांनी भेट दिली. या प्रसंगी त्यांच्यासोबत उत्तरा परांजपे, सहायक विजय खरे, ‘जलवर्धिनी’चे गुहागर तालुक्याचे प्रतिनिधी गजेंद्र पौनीकर, उमराठचे उपसरपंच संदीप गोरीवले, प्रमोद देसाई, विकास बारगोडे, श्री. हळदणकर उपस्थित होते. 


‘या टाक्या बांधण्यासाठी गजेंद्र पौनीकर यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतल्यामुळेच आम्ही या तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर टाक्या बांधू शकलो,’ असे ‘जलवर्धिनी’च्या परांजपे यांनी सांगितले. 

गुहागर तालुक्यातील वडद, विसापूर, निगुंडळ, कौंढर, पांगारी तर्फे वेळंब, पिंपर, वेळंब, पोमेंडी, गुहागर, उमराठ, वरवेली, कोतळूक, असगोली व हेदवी या १४ गावांत शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी नऊ हजार व १८ हजार क्षमतेच्या टाक्या बांधल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी पर्यावरण दिनीच ‘जलवर्धिनी’च्या माध्यमातून गुहागर तालुक्यात या टाक्या बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते.  


‘या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. प्रशासनाने टंचाईग्रस्त वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा केला; मात्र टॅंकरचे पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकचे ड्रम व भांडी यांच्या रांगा लागलेले चित्रच सगळीकडे पाहायला मिळाले. या वर उपाय म्हणून वाडीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून व संस्थेच्या सहकार्याने अशा टाक्या बांधल्या, तर गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल; तसेच टॅंकरचे पाणी या टाक्यांमध्ये ओतून त्याचे वितरण ग्रामस्थांना करता येईल,’ असे मत या वेळी विजय खरे यांनी व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 71 Days ago
Can similar tanks be built in other places ? They will be insurance against Uncertainty of the rains next year . Make the best of the current rains , and store as much as possible . After all , best to be ready to face the uncertainty of the rains next year
0
0
Veerkkumar doshi About 72 Days ago
Lladies presence solicited on regulating water consumption veerkumar doshi
0
0

Select Language
Share Link
 
Search