Next
भल्या मोठ्या ‘गांधी चष्म्या’ची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद
BOI
Friday, March 15, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this story


नाशिक : ‘नाशिक शहर काँग्रेस सेवादला’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘गांधी चष्म्या’च्या जगातील सर्वांत मोठ्या प्रतिकृतीची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. त्या नोंदीचे प्रमाणपत्र नुकतेच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमुख वत्सला कुणाल बॅनर्जी यांच्या हस्ते ‘नाशिक शहर काँग्रेस सेवादला’चे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांना देण्यात आले. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर २०१७ला ‘नाशिक शहर काँग्रेस सेवादला’ने, सात बाय नऊ फूट आकाराचा हा चष्मा तयार केला होता. या आगळ्या-वेगळ्या चष्म्याची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. 

गांधीजींच्या चष्म्याची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद होण्याची ही पहिलीच वेळ असून नाशिक येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा चष्मा खास कारागिराकडून बनवून घेतला होता. हा चष्मा बनवणाऱ्या कारागिराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. नाशिक काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी चष्म्यासाठी परिश्रम घेतल्याचे डॉ वसंत ठाकूर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link