Next
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान जनजागृतीला प्रारंभ
प्रेस रिलीज
Thursday, April 04, 2019 | 03:10 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘मतदारांना जागृत करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राज्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरिच ब्यूरोद्वारे महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती नवी दिल्लीचे ब्युरो ऑफ आउटरीच कम्युनिकेशनचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी दिली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत फिरते चित्रवाहन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्र सूचना कार्यालय व रिजनल आउटरिच ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक डी. जे. नारायण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, पुणे रिजनल आउटरिच ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा, ‘स्वीप’चे समन्वयक सुभाष बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, सहाय्यक संचालक भारत देवमनी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, व्यवस्थापक जितेंद्र पानपाटील, प्रशासकीय अधिकारी सुनील डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.



जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले, ‘पुणे जिल्ह्यात ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती काम नियोजनबद्ध पद्धतीने चालू असून, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ७० टक्क्याहून अधिक मतदान व्हावे यासाठी विविध माध्यमाचा वापर केला जात आहे. रिजनल आउटरिज ब्युरोद्वारे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेद्वारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यास नक्कीच मदत हाईल.’
 
या कार्यक्रमाचा शुभारंभ महासंचालक सत्येंद्र प्रकाश व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फित कापून व हवेत फुगे सोडून केला. राज्यात या जनजागृती मोहिमेस प्रारंभ झाला असून, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिका, संगीत अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search