Next
पुणेकर रंगले अनोख्या रंगसोहळ्यात
BOI
Monday, March 11, 2019 | 03:35 PM
15 0 0
Share this story

मायकेलेंजेलोपुणे : प्रसिद्ध इटालियन चित्रकार आणि शिल्पकार मायकलेंजलो यांची सहा मार्चला जयंती होती. त्यांना अभिवादन करण्यासाठी येथील ‘पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप’तर्फे १०० चित्रकार आणि सात शिल्पकार यांनी एकत्र येत व्यक्तीचित्रणाचा उपक्रम केला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून यानिमित्ताने रंगांचा एक वेगळा सोहळा पुणेकरांना अनुभवता आला. 

प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी स्थापन केलेल्या ‘पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप’तर्फे शहरातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था’ याठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १०० चित्रकार आणि सात शिल्पकार यांनी एकत्र येत व्यक्तिचित्रण केले. 

समोर बसलेले मॉडेल आणि त्यांच्या निरनिराळ्या छटा टिपण्यासाठी कॅनव्हासवर रंगारेषांची जुळवाजुळव करण्यात तल्लीन झालेले चित्रकार असे मंत्रमुग्ध करणारे चित्र या वेळी पाहायला मिळाले. इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकलेंजलो यांना वाहिलेली ही आदरांजली निश्चितच अनोखी ठरली.  

(उपक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link