Next
‘सनदी लेखापालांनी ‘मेक इन इंडिया’साठी पुढे यावे’
‘आयसीएआय’तर्फे आयोजित चर्चासत्रात भावेश ठक्कर याचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, June 05, 2019 | 06:18 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 'मेक इन इंडिया' हा उपक्रम महत्त्वाचा आहे. केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात सनदी लेखापाल महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे आपल्या ग्राहकाला त्याबद्दलचे मार्गदर्शन देऊन ‘मेक इन इंडिया’ साकारण्यासाठी ‘सीएं’नी पुढाकार घ्यावा,’ असे मत सीए भावेश ठक्कर यांनी व्यक्त केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ‘मेक इन इंडियामध्ये सीएची भूमिका’ या विषयावर ‘एमएसएमई’ परिषदेत ते बोलत होते. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे झालेल्या चर्चासत्रावेळी सीए जुल्फेश शाह, सीए माहेश्वर मराठे आणि सीए कुसाई गोवावाला यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, सचिव समीर लड्ढा, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, खजिनदार सीए काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते.


ठक्कर म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकता वाढीसाठी मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅंड अप इंडिया असे अनेक उपक्रम आणले आहेत. अर्थव्यवस्थेला उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे गती मिळत असते. त्यामुळे उद्योगांना सक्षम करण्यासाठी मेक इन इंडिया उपयुक्त आहे. त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी सीएंनी महत्त्वाची भूमिका बजावावी.’

सीए जुल्फेश शहा यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक व महिला उद्योग धोरणाविषयी विवेचन केले. सीए माहेश्वर मराठे यांनी ‘एमएसएमई’ नोंदणीचे फायदे, तर सीए कुसाई गोवावाला यांनी ‘अकाउंटिंग टॅक्स ट्रीटमेंट’वर मार्गदर्शन केले. चंद्रशेखर चितळे, आनंद जाखोटिया, ऋता चितळे यांनीही आपले मत मांडले. समीर लड्ढा यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक धामणे यांनी आभार मानले.                                                                                  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search