Next
‘समृद्धम्’तर्फे नंदुरबारमध्ये सकस आहाराचे वाटप
प्रेस रिलीज
Wednesday, September 26, 2018 | 03:53 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोपुणे : नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित मुलांचा दिवसेंदिवस गंभीर होत आहे, याची दाखल घेऊन येथील समृद्धम् फाउंडेशनतर्फे चाळीसगाव तालुक्यातील दोन हजार २०० मुलांना त्यांच्या वाडी वस्तीवर जाऊन सकस आहाराच्या  टीनचे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे नियोजन संस्थेच्या उपाध्यक्षा वर्षा पांचाळ, पदाधिकारी शिक्षिका सुनिता साळुंके, नीलेश पडवळ, मीना पाटील, मंगला कुमावत यांसह स्थानिक कार्यकर्ते योगेश शिरसाठ, राज मरसाळे यांनी केले होते. समृद्धम् फाउंडेशन नंदुरबार जिल्ह्यात २०१३पासून कुपोषित बालकांसाठी सकस आहार पुरविण्याचे कार्य स्वखर्चाने करत आहे. संस्थेने २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत दरवर्षी ३० हजार मुलांना सकस आहार पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव तालुक्यातील टाकळीगाव, हिरापूर, वाघडू आणि वाकडी या गावांत सुमारे दोन हजार २०० मुलांना त्यांच्या वाडीवस्तीवर जाऊन सकस आहाराचे टीन मोफत देण्यात आले.

‘नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित मुलांचा प्रश्न दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. त्यासाठी आम्ही गावोगावी जाऊन सहा वर्षांखालील बालकांना सकस आहाराच्या टीनचे मोफत वाटप करतो; तसेच त्यांच्या पालकांना आहाराविषयक आणि मुलांच्या आरोग्यविषयक वेळोवेळी मार्गदर्शन करतो,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय पांचाळ यांनी दिली.

येत्या दहा वर्षांत नंदुरबार जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प असल्याचेही पांचाळ यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravindra Padwal About 362 Days ago
Well done Samruddham Foundation ! Congrats and All The Best !!
0
0

Select Language
Share Link
 
Search