Next
‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ पुस्तक संचाचे ११ ला प्रकाशन
प्रेस रिलीज
Monday, November 06, 2017 | 06:40 PM
15 0 0
Share this article:

स्वामी विवेकानंदपुणे : ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागातर्फे ‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ पुस्तक संचच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती ‘विवेकानंद’चे महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट आणि सचिव सुधीर जोगळेकर यांनी दिली.

स्वामी विवेकानंदांच्या मानसकन्या भगिनी निवेदिता यांच्या ऑक्टोबर २०१७पासून १५०व्या जयंती वर्षास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त या पुस्तक संचातील चार पुस्तकांचे प्रकाशन केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे. या समारंभाला महापौर मुक्ता टिळक, विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष पद्मश्री निवेदिता भिडे उपस्थित राहणार आहेत.  

‘प्रकाशित होणार्‍या चार पुस्तकांमध्ये ‘भारतीय मूल्यविचार’ : डॉ. सुरूचि पांडे, ‘शिक्षण विचार’ : डॉ. स्वर्णलता भिशीकर, ‘स्वातंत्र्यलढा-सहभाग आणि चिंतन’ : प्रा.मृणालिनी चितळे, ‘कला आणि राष्ट्रविचार’ : आदिती जोगळेकर-हर्डीकर यांचा समावेश आहे. ८०० पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तक संचाचे मूल्य ७०० रुपये असून प्रकाशनापूर्वी ते ५०० रुपये किंमतीत उपलब्ध असणार आहे; तसेच प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी हा संच ५० टक्के सवलतीत उपलब्ध होईल,’ असे जोगळेकर यांनी सांगितले.

प्रकाशनाविषयी :

दिवस : शनिवार, ११ नोव्हेंबर २०१७
वेळ : दुपारी ४.३० वाजता
स्थळ : लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ पोलिस चौकीजवळ, पुणे ३०.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search