Next
आर. बी. सूर्यवंशी विश्वकर्मा पुरस्काराने सन्मानित
प्रेस रिलीज
Thursday, April 04, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this article:



पुणे : येथील बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सूर्यवंशी यांना स्थापत्य अभियांत्रिकी व बांधकाम उद्योगातील त्यांच्या ५५ वर्षांहून अधिक काळाच्या बहुमोल व महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल व राष्ट्र उभारणीस उपयुक्त अशा उद्योग क्षेत्रात निर्माण केलेल्या उच्चस्तरीय मापदंडाबद्दल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल (सीआयडीसी) यांच्यातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार २०१९- इंडस्ट्री कॅप्टन’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे ‘सीआयडीसी’च्या २३व्या वार्षिक दिनानिमित आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय सांख्यिकी खात्याचे मंत्री विजय गोयल हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या वेळी ‘सीआयडीसी’चे अध्यक्ष डॉ. पी. एस. राणा, आयएएस (निवृत्त) आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, त्रिपुरा स्टेट प्लॅनिंग बोर्डाचे उपाध्यक्ष आर. के. माथुर, सीपीडब्ल्यूडी- डीजी प्रभाकर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

निती आयोगाने इंडियन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिलची (सीआयडीसी) निर्मिती केली आहे. हे राष्ट्रीय पातळीवरील एक उच्च मंडळ असून, त्यांनी भारतीय बांधकाम उद्योग क्षेत्रात चांगल्या योजना कार्यान्वित करण्याच्या कार्यासाठी अथकपणे वाहून घेतले आहे. ‘सीआयडीसी’ यांनी भारतीय बांधकाम उद्योगाची वाढ व विकास करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांची निवड करून त्यांना उत्तेजन देण्यासाठी व त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी ‘सीआयडीसी’ विश्वकर्मा पुरस्कार सुरू केला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search