Next
मुकुल माधव फाउंडेशनतर्फे १०१ वृक्षांचे रोपण
दादा वासवानी यांच्या स्मरणार्थ उपक्रम
प्रेस रिलीज
Thursday, August 30, 2018 | 06:20 PM
15 0 0
Share this article:

मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दादा वासवानी यांच्या स्मरणार्थ १०१ झाडांचे रोपण करण्यात आले. या वेळी माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्यासह  पोलीस उपअधीक्षक सागर करंडे, नगराध्यक्ष साधना भोसले, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अध्यक्ष सचिन ढोले आदी

पुणे : ‘निसर्गसंवर्धनासाठी वृक्ष लागवड अतिशय महत्वाची असून, लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन होणे गरजेचे आहे. ‘निर्मल-हरित पंढरपूर अभियान’ अंतर्गत लावलेल्या झाडांचे तीन वर्षे संगोपन केले जाणार आहे;तसेच दणकट लोखंडी संरक्षक जाळ्या बसवून त्याचे संवर्धन केले जाणार आहे, ही आनंदाची बाब आहे’, असे प्रतिपादन माजी आमदार व ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांनी केले. 

दादा वासवानी
पंढरपूर येथील गोपाळपूर रोड परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व श्री रिध्दी सिध्दी मंदिराच्या प्रांगणात पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशन व थेऊर येथील देवराई नर्सरी यांच्या वतीने ‘जय गणेश हरित वारी’ अभियानांतर्गत दादा वासवानी यांच्या स्मरणार्थ १०१ देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

या वेळी पोलीस उपअधीक्षक सागर करंडे, नाशिक येथील साध्वी वेणभारती महाराज, नगराध्यक्ष साधना भोसले, नगरपरिषद सदस्य नवनाथ रांगट, उमा डोंबे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अध्यक्ष सचिन ढोले, विश्वस्त ह.भ.प शिवाजीराव मोरे, शकुंतला नडगिरे,  फिनोलेक्सचे संजय अलिकेटी यांच्यासह समितीचे कर्मचारी-पुजारी उपस्थित होते.

शिवाजीराव मोरे म्हणाले, ‘दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट, वनराई, देवराई यांच्यासह इतर २२ संस्थांच्या पुढाकारातून ‘निर्मल-हरित पंढरपूर अभियान’ राबविले जात आहे. याअंतर्गत वृक्षारोपण करण्यात येत असून, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमार्गासह राज्यभरातून येणाऱ्या इतर १४० पालखीमार्गावर ९८ हजार ९२३ इतकी झाडे लावली जाणार आहेत. ही सगळी देशी झाडे असून, देवराई नर्सरीचे रघुनाथ ढोले यांनी ही रोपे दिली आहेत.’

‘या झाडांच्या संरक्षणासाठी दणकट लोखंडी संरक्षक जाळ्या बसवून त्याचे संवर्धन केले जाणार आहे, या लोखंडी जाळ्या चोरीला जाऊ नयेत, यासाठी लवकरच भंगार व्यावसायिकांची बैठक घेतली जाणार आहे’, असे सागर करंडे यांनी सांगितले. 

‘दादा वासवानी यांच्या स्मृती जपण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे  १०१ झाडे लावण्यात आली आहेत’, असे मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका रितू छाब्रिया यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search