Next
‘साई सेवक योजने’ला देशभरातून प्रतिसाद
प्रेस रिलीज
Wednesday, May 30, 2018 | 02:22 PM
15 0 0
Share this story

शिर्डी : श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्ताने श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्था यांच्यातर्फे २९ जुलै २०१७पासून सुरू करण्‍यात आलेल्‍या  साई सेवक योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून, देशातील विविध राज्‍यांतून साईभक्‍त या योजनेत सहभागी होत आहे.

श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्ताने संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्‍या संकल्‍पनेतून श्री साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणे व भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या साई सेवक योजनेमध्‍ये साई सेवकांचा २१ व्‍यक्‍तींचा एक गट तयार करण्यात येत असून, मंगळवार ते सोमवार एक गट काम करत आहे, असे एका आठवडयात सकाळी सहा ते दुपारी दोन व दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत हे साई सेवक आठवडाभर सेवा देत आहेत.

या योजनेमध्‍ये महाराष्‍ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्‍ली, ओरिसा, तामिळनाडू, मध्‍यप्रदेश, केरळ व उत्‍तराखंड आदी राज्‍यामधून ५२० साई सेवक गटांनी नोंदणी केलेली असून, आजतागायात ३६३ साई सेवक गटांच्‍या माध्‍यमातून सात हजार २६१ साईभक्‍तांनी साई सेवक योजनेतून सेवा दिलेली आहे. या योजनेत यापुढे १५७ साई सेवक गट प्रतिक्षा यादीवर आहेत.

या साई सेवकांना मंदिर परिसर, संरक्षण विभाग, श्री साई प्रसादालय, हॉस्पिटल, लाडु विभाग व निवासस्थाने याठिकाणी वर्षातून सलग सात दिवस साई सेवेची संधी दिली जाते. या साई सेवकांना ओळखपत्र, गणवेश देऊन त्यांची संस्‍थानच्‍या वतीने निवास, भोजन, नाष्‍टा व चहापाण्‍याची व्‍यवस्‍था मोफत करण्‍यात येत आहे. दर मंगळवारी आलेल्‍या सेवेकऱ्यांचे स्‍वागत करून सेवा पूर्ण झालेल्‍या सेवकऱ्यांचा संस्‍थानतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्‍मान केला जातो; तसेच या उपक्रमात सहभागी होणाऱ्या साई सेवकांना स्‍वच्‍छता व व्यसनमुक्तीची शपथही दिली जाते.

साई सेवक योजनेत सहभागी होण्‍यासाठी संपर्क : (०२४२३) २५८८१०/११

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link