Next
फक्त सहा दिवसांत स्मरणशक्ती वाढवा + सहा दिवसांत मनाची शक्ती वाढवा
BOI
Wednesday, June 20 | 09:49 AM
15 0 0
Share this story

श्याम मराठे ही दोन्ही पुस्तके अवघड गोष्टी कमीतकमी वेळात कशा साध्य करायच्या याची माहिती देतात. पहिल्या पुस्तकात त्यांनी मनाची शक्ती वाढवण्यासाठी दरदिवशी काय करावे, याची माहिती दिली आहे. म्हणजे पहिल्या दिवशी मनाचे चमत्कार प्रत्यक्ष कसे अनुभवायचे, दुसऱ्या दिवशी अवघड गोष्टी साध्य करण्यासाठी सोपे उपाय कसे अवलंबावेत याची ओळख करून दिली आहे. याच पद्धतीने पुढचे तीन दिवस काय करावे, याची माहिती दिली आहे.

मनाच्या शक्तीप्रमाणेच स्मरणशक्तीही सहा दिवसांत वाढवता येते, असे ते त्यांच्या दुसऱ्या पुस्तकातून सांगतात. आकडे, वस्तूंच्या साह्याने, जुन्याला नवे जोडायचे शास्त्र आणि कला अवगत करून, खेळ खेळून स्मरणशक्ती शक्ती वाढवावी किंवा केवळ एकदा ऐकून तोंडपाठ कसे करावे, याची माहिती मिळते.

प्रकाशक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन
पाने : --
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link