Next
गडचिरोलीतील मुलांना सातशे पुस्तके प्रदान
दिलीप काळोखे मित्र परिवाराचा पुढाकार
BOI
Wednesday, October 03, 2018 | 03:14 PM
15 0 0
Share this story

माजी नगरसेवक दिलीप काळोखे मित्र परिवारच्यावतीने महात्मा गांधींच्या वेशातील युवकाची ग्रंथतुला करुन गडचिरोलीतील मुलांना पुस्तके देण्यात आली. या वेळी गिरीश बापट, दिलीप कांबळे, प्रदीप रावत,  डॉ. न. म.  जोशी, डॉ. अशोक कामत, डॉ. गजानन एकबोटे,आबा बागुल आदी

पुणे : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातील मुलांना उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत या उद्देशाने त्यांना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महापुरुषांचे चरित्र सांगणारी सातशे पुस्तके देण्यात आली. तसेच या मुलांना ११ हजार रुपयांची मदतही देण्यात आली. ५० पेक्षा अधिक मुलांना ही मदत देण्यात आली. माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महात्मा गांधींजींच्या वेशातील तरुणाची ग्रंथतुला करून, सातशे पुस्तके या मुलांना देण्यात आली.  

दिलीप काळोखे मित्र परिवारच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, दिलीप कांबळे, प्रदीप रावत, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म.  जोशी, डॉ. अशोक कामत, डॉ. गजानन एकबोटे, महेश करपे, आबा बागूल, अभय छाजेड, माधव जगताप, उदय जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी गिरीश बापट म्हणाले, ‘महात्मा गांधीजींचे विचार देशभरात प्रत्येकाने प्रत्यक्षात आणले पाहिजेत. समाजात वाईटापेक्षा चांगल्या गोष्टी जास्त आहेत; मात्र, चांगल्या व्यक्ती शांत आहेत म्हणून चांगले काम पुढे येत नाही. त्यामुळे आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने काम केले पाहिजे.’ 

डॉ. अशोक कामत म्हणाले, ‘चारित्र्य, देशभक्ती, त्याग या भावनेने लोकमान्य टिळकांनी समाजात काम करण्यासोबतच देशभक्ती जागविली. आजही अशा चारित्र्याची निखळ माणसे पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे अनेक संस्था आपल्या सामाजिक कार्यातून मोठया झाल्या आहेत.’ 

दिलीप काळोखे मित्र परिवाराच्यावतीने भजनी मंडळांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट, वृक्षारोपण, गरजू मुलांना मोफत कपडे असे विविध उपक्रमदेखील यानिमित्ताने राबविण्यात आले. 

                                  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link