Next
‘होंडा’तर्फे 200व्या ‘बेस्ट डील’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, March 31, 2018 | 04:29 PM
15 0 0
Share this story

पुणे : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने आज महाराष्ट्रातील पुणे येथील गगन विंग्स होंडा येथे नुकतेच २००व्या ‘बेस्ट डील’ आउटलेटचे उद्घाटन केले. होंडा टू-व्हीलर्स इंडियाने ‘बेस्ट डील’ या प्रमाणित प्री-ओन्ड आउटलेटची संकल्पना सर्वप्रथम आणली. खास प्री-ओन्ड टू-व्हीलर्ससाठी निर्माण केलेली या उद्योगातील ही पहिली रिटेल सुविधा आहे.

बाजारातील भविष्यातील क्षमता विचारात घेता, ‘होंडा’ने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत ‘बेस्ट डील’ची संख्या २०० म्हणजे दुप्पट केली. ‘होंडा’ने बेस्ट डील संकल्पना नव्या ठिकाणी, प्रामुख्याने टिअर दोन शहरांमध्ये नेऊन नेटवर्क विस्ताराला पाठबळ दिले. केवळ दोन वर्षांमध्ये, होंडाचा प्री-ओन्ड बिझनेस भारतातील २२ राज्यांचा समावेश करत, ७५ शहरांवरून १५३ शहरांपर्यंत दुप्पट वाढला.

या विस्तारामुळे विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली. मागणीमध्ये वाढ झाल्याने, या कालावधीत बेस्ट डीलची एकूण विक्री ४५ हजारांवरून वरून एक लाख ग्राहक इतकी दुप्पट वाढली.

२००व्या ‘बेस्ट डील’चे उद्घाटन करताना ‘होंडा’च्या सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘संघटित प्री-ओन्ड टू-व्हीलर व्यवसायाचा प्रवर्तक म्हणून, भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा आम्ही जाणतो. विखुरलेल्या व असंघटित प्री-ओन्ड टू-व्हीलर बाजाराच्या बाबतीत होंडाने सर्व चित्र बदलले आहे. ‘बेस्ट डील’तर्फे उच्च गुणवत्ता, विश्वासार्ह प्री-ओन्ड टू-व्हीलर्स, तसेच सहा महिने वॉरंटी व किफायतशीर किंमत दिली जाते.’

‘होंडा’च्या ‘बेस्ट डील’ बिझनेसविषयी :
‘बेस्ट डील’ ग्राहकांना होंडा टू-व्हीलर अतिशय किफायतशीर दराने खरेदी करण्याची संधी देते. ग्राहकांना त्यांची जुनी टू-व्हीलर देऊन नवी किंवा प्रमाणित प्री-ओन्ड होंडा टू-व्हीलर घेता येऊ शकते. त्यामार्फत ग्राहकांना दोन मोफत सर्व्हिस, सहा महिने वॉरंटी व आफ्टर-सेल्स सेवाही दिली जाते.

ग्राहकांना मालकाच्या कागदपत्रांची खातरजमा करण्याची व नव्या ग्राहकांनाकडे मालकी झटपट हस्तांतरित करण्याची सुविधा दिली जाईल. कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्री-होंडा टू-व्हीलर्सचे नूतनीकरण केले आहे. त्यामध्ये ‘होंडा’चे अस्सल भाग वापरले आहेत; तसेच विश्वास व पारदर्शकताही समाविष्ट केली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link