Next
‘इंडियन चॅम्पियनशिप ऑफ कॉस्प्ले’चा विजेता अक्षय चुरी
प्रेस रिलीज
Monday, February 18, 2019 | 03:58 PM
15 0 0
Share this story

मुंबई : देशातील चार मोठ्या शहरांमध्ये सर्वात मोठे पॉप कल्चर सोहळे आयोजित करणाऱ्या कॉमिक कॉन इंडियाने ‘मारुती सुझुकी एरीना इंडियन चॅम्पियनशिप ऑफ कॉस्प्ले (आयसीसी) २०१९’चे विजेते जाहीर केले आहेत. जिम रेनॉर म्हणून कॉस्प्ले करणारा अक्षय चुरी या स्पर्धेचा विजेता ठरला आहे, तर जिप्सी अॅव्हेंजर म्हणून कॉस्प्ले करणारा शाइन साहा फॅन फेव्हरिट अॅवॉर्डचा विजेता ठरला आहे.

अलीकडच्या काळात कॉस्च्युम प्ले किंवा ‘कॉस्प्ले’ हा पॉप कल्चर सेलिब्रेशनचा एक अविभाज्य भाग बनला आहे. देशभरात सर्वांत मोठी कॉस्प्ले स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ‘आयसीसी’ हा कॉमिक कॉन इंडियाचा उपक्रम असून याचा उद्देश स्थानिक प्रतिभावंतांना व्यावसायिक बनून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. अत्यंत प्रतिभावान भारतीय कॉस्प्ले कलाकारांना एकमेकांशी चढाओढ करण्याची व पुढे जाऊन शिकागो येथे आयोजित अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वांत मोठ्या कॉस्प्ले स्पर्धेत ‘क्राऊन चॅम्पियनशिप्स ऑफ कॉस्प्ले’ या वार्षिक समारंभात भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.

कॉमिक कॉन इंडियाचे संस्थापक जतीन वर्मा म्हणाले, ‘कॉमिक कॉन इंडियाने आपल्या स्थापनेपासून होतकरू कॉस्प्ले कलाकारांना त्यांची कला व्यावसायिकरित्या विकसित करण्यासाठी मंच पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक प्रतिभावंतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कसब दर्शविण्याची संधी देऊन देशातील कॉस्प्ले इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्याचे कामदेखील या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link