Next
पाडळपूर येथे शैक्षणिक साहित्य मेळावा
शशिकांत घासकडबी
Thursday, January 03 | 01:08 PM
15 0 0
Share this storyनंदुरबार : गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात गणित सप्ताह साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने तळोदा तालुक्यातील पाडळपूर येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमार्फत गणित विषयाचा शैक्षणिक साहित्य मेळावा घेण्यात आला.

सरपंच सुरूपसिंग ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मेळाव्यात लर्निंग कॅम्पमध्ये झालेल्या, तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यासलेल्या क्रियाकृतीवर गणिताचे उत्कृष्ट मॉडेल सादर केले. चढता-उतरता क्रम, दहाचा माइंड मॅप, वेळा पद्धतीने पाढे तयार करणे, संख्याचक्र, रोमन संख्यांचा शोध लावणे, आकारांची ओळख, संख्यावाचन तक्ता अशा प्रकारच्या मॉडेल्सचा यामध्ये समावेश होता. मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या मेळाव्यामुळे गावात शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. ढेकाटे, श्री. सोलनके, अंगणवाडी सेविका शकीला पाडवी, शाळा समिती अध्यक्ष राजू ठाकरे, तसेच प्रथम एज्युकेशनचे तालुकाप्रमुख विकास निकुंभे, समन्वयक घनश्याम सूर्यवंशी, अनिलकुमार भिलाव, अक्षयकुमार वळवी, विजय भिलावे, सुकदेव ठाकरे, शिवनाथ ठाकरे यांचे सहकार्य लाभले. या वेळी विद्यार्थी, ग्रामस्थ, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link