Next
बसणीच्या ‘समर्थ रंगभूमी’चे बालनाट्य राज्य स्पर्धेत सादर
‘पुलं’च्या ‘नवे गोकुळ’ नाटकाचा कोल्हापूर केंद्रावर दमदार प्रयोग
BOI
Wednesday, January 09, 2019 | 01:04 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील समर्थ रंगभूमीच्या बालचमूने बाल राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर दमदार सादरीकरण केले. पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, त्यांनी लिहिलेल्या ‘नवे गोकुळ’ या नाटकाचा प्रयोग या मुलांनी उत्तमरीत्या सादर केला.यंदा या स्पर्धेत रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करणारे हे एकमेव नाटक होते. वीस मुलांच्या चमूने हे बालनाट्य सादर केले. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या रत्नागिरी केंद्राच्या प्रमुख आसावरी शेट्ये यांनी या नाटकाची निर्मिती केली होती.ज्येष्ठ रंगकर्मी राजकिरण दळी यांनी दिग्दर्शनाची, तर किरण जोशी यांनी नेपथ्य आणि सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. सत्यजित गुरव यांनी रंगभूषा, श्रीकांत पाटील यांनी प्रकाशयोजना, नितीन लिमये, विजय रानडे यांनी संगीत संयोजन, मीरा खालगावकर यांनी नृत्यदिग्दर्शन, तर आसावरी शेट्ये यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली होती. नाटक उत्तम पद्धतीने सादर होण्यासाठी आसावरी शेट्ये, किरण जोशी, राजकिरण दळी यांनी विशेष परिश्रम घेतले.‘पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष एवढाच ‘नवे गोकुळ’ हे बालनाट्य निवडण्याचा हेतू नाही. १९५८ साली त्या वेळच्या मुलांसाठी लिहिलेले हे नाटक आज ६० वर्षांनंतरही, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही बालकांचे १०० टक्के मनोरंजन करते. प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत यांच्या चक्रात फारसे न अडकता हे नाटक अत्यंत साध्या, सोप्या, सरळ आणि निष्पाप शब्दांत खूप मोठा संदेश मुलांच्या मनापर्यंत पोहोचवते. म्हणूनच ते नाटक सादर कराये आम्ही ठरवले. स्वच्छ भारत अभियानाचे औचित्यही याद्वारे साधले गेले आहे. अर्थात ही ‘पुलं’च्या शब्दांची किमया आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत,’ अशी भावना नाटकाच्या निर्मात्या आसावरी शेट्ये यांनी व्यक्त केली.

(‘नवे गोकुळ’ या बालनाट्याचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रकाश पारखी About 255 Days ago
आसावरी ताई मनःपुर्वक अभिनंदन ! पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवे गोकुळ या बालनाट्याची निर्मिती करुन एक चांगली सुरुवात केली आहे.
0
0

Select Language
Share Link
 
Search