Next
नगरमध्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्टस असोसिएशनचा उपक्रम
BOI
Tuesday, November 27, 2018 | 06:21 PM
15 0 0
Share this article:

अहमदनगर : उदयोन्मुख गायक कलाकारांना संधी देण्याच्या उद्देशाने अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्टस असोसिएशनच्या वतीने ‘राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. १५ व १६ डिसेंबरला या स्पर्धा होणार असून, अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. यासाठी महाविद्यालयाच्या परवानगीचे पत्र आवश्यक आहे. याकरता ऑनलाइन अर्ज करायचा असून, त्यासाठी आठ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे;तसेच यासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क आहे. माऊली सभागृह, सावेडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेला  कांकरिया उद्योग समुहाने सहकार्य केले आहे. 

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी, १६ डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते होणार आहे. एकूण आठ बक्षीसे देण्यात येणार असून, प्रथम क्रमाकांच्या विजेत्याला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला अकरा हजार रुपये, तृतीय क्रमांकाला सात हजार रुपये तर उत्तेजनार्थ पाच विजेत्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. 

 
स्पर्धा घोषित झाल्यापासून स्पर्धकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली असून, खामगांव, हिंगोलीपासून ते पुणे, मुंबई, सातारा,सांगली,कोल्हापूरसह उभ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.. 

स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंकवरून ऑनलाइन अर्ज करावा.  

स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी : 
अमित काळे -९४२२२ २४८८४, ज्ञानेश कुलकर्णी -९८२३३ ९६६३६, संतोष बडे -९८२३३ ८५१५६, उपेंद्र कुलकर्णी -७७९८० ०००५६ , सागर जोशी- ८८०५६ ७४१४१   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search