Next
‘महिंद्रा’कडून ट्रिओ इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर रेंज प्रदर्शित
प्रेस रिलीज
Tuesday, September 11, 2018 | 04:47 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : नीती आयोगाने आयोजित केलेल्या मूव्ह २०१८ या जागतिक मोबिलिटी समिटमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपली नवी इलेक्ट्रिक वाहने, लिथिअम आयन बॅटरीचे बळ असलेली इलेक्ट्रिक थ्री व्हीलर्स, ट्रिओ व ट्रिओ यारी प्रदर्शित केली.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा व महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यपस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका, सरकार व कंपनीतील अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत वाहने दाखवण्यात आली. मूव्ह २०१८च्या उद्घाटन सत्रामध्ये, आनंद महिंद्रा यांनी फ्युचर ऑफ मोबिलिटीवर भर देत प्रमुख भाषण केले. ट्रिओ व ट्रिओ यारी ही वाहने बाजारात इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्सचे अनुक्रमे डी+३ व डी+४ प्रकार म्हणून उपलब्ध होतील.

या निमित्त बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यपस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका म्हणाले, ‘पूर्णतः इलेक्ट्रिक वाहने अंगिकारण्याची भारताची आकांक्षा असताना, शहरातील मोठ्या प्रमाणातील वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय विकसित करण्याची ही योग्य वेळ आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहतुकीतील प्रवर्तक म्हणून, ईव्ही श्रेणी सर्वांसाठी स्वीकारार्ह ठरावी व मोठ्या प्रमाणातील वाहतुकीला चालना मिळावी यासाठी महिंद्रा प्रयत्नशील आहे. आज, ट्रिओचे अनावरण करून, ईव्हींचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यास उत्तेजन देताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे. ट्रिओ वाहनामुळे आम्हाला भारतातील शहरी भागात सर्वाधिक पसंती मिळेल, अशी अपेक्षा आहे.’

महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘वाहतुकीचे भविष्यातील आधुनिक रूप ठरण्याची अपेक्षा असलेल्या ट्रिओमुळे इलेक्ट्रिक वाहने व कनेक्टिविटी यांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. आपापल्या श्रेणीमध्ये सर्वाधिक रेंज असलेली ट्रिओ व ट्रिओ यारी ही वाहने भारतातील शहरी भागातील वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आदर्श ठरणार आहेत. थ्री-व्हीलर श्रेणीची आकार विचारात घेता, त्यामध्ये भारताच्या पूर्णतः इलेक्ट्रिक वाहतुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षणीय योगदान देण्याची क्षमता आहे. वाहनांमुळे त्यांच्या मालकांना व चालकांना उत्पन्नामध्ये २० ते २५ टक्के वाढ करण्याची संधी दिली जाते. त्यांच्यासाठी हे प्रमाण लक्षणीय आहे.’

ट्रिओ हे वाहन देशातील सर्वात स्वच्छ, सर्वात कार्यक्षम शहरी वाहतूक साधन म्हणून सेवा देण्यासाठी सुसज्ज आहे. या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर रेंजमध्ये नव्या लिथिअम आयन बॅटरी तंत्रज्ञानाचा समावेश असून ती अधिक टिकाऊ आहे व अन्य बॅटरी केमिस्ट्रीच्या तुलनेत त्यासाठी कमी देखभाल आवश्यक असते.

कंपनीने मूव्ह २०१८मध्ये वाहतुकीतील अन्य नाविन्यही दर्शवले. त्यामध्ये मोड्युलर व स्केलेबल इलेक्ट्रिक सुविधा मेस्मा, सॉफ्टवेअर मोबिलिटी सोल्यूशनचे प्रात्यक्षिक नेमो व भविष्यात्मक मसल इलेक्ट्रिक पॉड संकल्पना उडो, यांचा समावेश होता. महिंद्राने आपल्या फ्युचर ऑफ मोबिलिटी सुविधेचे डिजिटल प्रदर्शनही केले. ही सुविधा स्वच्छ, कनेक्टेड व सोयीची असणार आहे.

‘शून्य प्रदूषण’ करणारे लिथिअम आयन बॅटरी तंत्रज्ञान, कमी मेंटेनन्स, टिकाऊ, इन-बिल्ट सक्षम क्रॅश गार्ड, गंज व पोक न येणारी बॉडी, आरामदायीपणे विना-आवाज व विना-कंपने गाडी चालवणे, अर्गोनॉमिकली डिझाइन्ड, ऐसपैस अंतर्भाग, बाहेरचे डिझाइन आधुनिक व आकर्षक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मायलेज, ठिकाण व बॅटरीची सद्यस्थिती यांची दुरूनच, नेमो टेकद्वारे पाहणी ही ट्रिओची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
 
ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करणाऱ्या ट्रिओ व ट्रिओ यारी या दोन्हींमध्ये सॉफ्ट टॉप व हार्ड टॉप प्रकार असतील. ट्रिओ अत्याधुनिक वाहतूक सुविधा देत असून, त्या टेलिमॅटिक्स तंत्रज्ञानाचा समावेश असलेली वैशिष्ट्ये उपलब्ध करतात. या वैशिष्ट्यांना महिंद्रा इलेक्ट्रिकच्या नेमोचे पाठबळ आहे व वाहनांमध्ये मूल्यवर्धित वैशिष्ट्ये म्हणून ती उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link