Next
रेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहानिमित्त मार्गदर्शन
एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचा उपक्रम
BOI
Friday, May 17, 2019 | 04:06 PM
15 0 0
Share this article:

जागतिक रेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहानिमित्त एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये आयोजित  कार्यक्रमात सहभागी झालेले डॉक्टर्स, रुग्ण व पालक.

पुणे : जागतिक रेटिनोब्लास्टोमा जागरूकता सप्ताहाचे औचित्य साधून १२ ते १८ मे दरम्यान,एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रेटिनोब्लास्टोमावर उपचार झालेले रूग्ण आणि त्यांचे पालक उपस्थित होते. रेटिनोब्लास्टोमा हा लहान मुलांना होणारा डोळ्यांचा कर्करोग असून, यावर उपचार करता येतात.

या वेळी पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे (पीबीएमए) अध्यक्ष नितीन देसाई, व्यवस्थापन समितीचे सदस्य मीना देसाई आणि रजनीकांत जेठा, अध्यक्ष राजेश शहा, मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. मदन देशपांडे व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष परवेझ बिलिमोरिया उपस्थित होते.

एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील ऑप्थॅल्मिक प्लॅस्टिक सर्जरी व ऑक्युलर आँकोलॉजी विभागाचे प्रमुख व वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ऑप्थॅल्मिक प्लॅस्टिक सर्जरी व ऑक्युलर आँकोलॉजी कन्सल्टंट डॉ. सोनल चौगुले यांनी रेटिनोब्लास्टोमा या डोळ्याच्या कर्करोगाविषयी माहिती दिली. 

सह्याद्री हॉस्पिटलमधील मेडिकल आँकोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील यांनी रेटिनोब्लास्टोमाग्रस्त लहान मुलांवर उपचार करताना बहुआयामी प्रयत्नांचे महत्त्व आणि सिस्टिॅमिक केमोथेरपी याबाबत माहिती दिली. एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमधील उपसंचालक डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी लवकर होणाऱ्या निदानाचे महत्त्व आणि उपचारानंतर घ्यावयाची काळजी यावर सादरीकरण केले. डॉ. कर्नल मदन देशपांडे यांनी उपचार घेतलेल्या मुलांचे आणि पालकांचे अनुभव सांगितले. या वेळी बेंगळुरू येथील स्वयंसेवी संस्था इक्षा फाउंडेशनचे संस्थापक अरविंद शेषाद्री, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील वैद्यकीय व्यवस्थापक कर्नल डॉ. व्ही. पी. अंदुरकर, पेडियाट्रिशन कर्नल डॉ. कुलकर्णी, अॅॅनेस्थेशिया विभागामधील डॉ. रोहितकुमार, वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप डोळे आणि सहकारी आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr Prafullkumar Sulay About 66 Days ago
Congratulations to team Ruby hall clinic ! Ruby hall clinic is always one step ahead to adapt new technology and to provide it to our patients. What is the approximate cost of such robotic surgery? All the best for future plans.
0
0

Select Language
Share Link
 
Search