Next
हिमायतनगरमध्ये बारा कोटींच्या विकासकामांना सुरुवात
नागेश शिंदे
Monday, March 11, 2019 | 11:28 AM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते शहरातील विविध भागांत बारा कोटींच्या वेगवेगळ्या विकासकामांना सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी आमदार पाटील यांनी येणाऱ्या दिवसांत शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन नागरिकांना दिले.

शहरातील सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, कचरा कोंडाळे, कोंडवाडा आदी कामांची सुरुवात आमदार पाटील, नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे यांच्या हस्ते सात मार्च २०१९ रोजी शहरातील विविध प्रभागांत करण्यात आली.

प्रभाग क्रमांक १२मध्ये आयोजित २५ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ प्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले, ‘कुणाल राठोड नगराध्यक्ष झाल्यापासून सहा महिन्यांतच शहरात बारा कोटींची विकासकामे आणली. या आधीची माझीही लाखो रुपयांची विकासकामे शहरात सुरू आहेत. या पुढेही मी विकासकामांसाठी निधी आणण्यात कुठेही कमी पडणार नाही. शहरातील प्रत्येक रस्ता मजबूत करण्याचा माझा मानस आहे. सुंदर, स्वच्छ शहर घडवण्यासाठी मला जनतेची साथ हवी आहे. या पुढचा विकासकामांच्या निधीचा शुभारंभ आकडा आणखी मोठा करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करणार आहे.’

या प्रसंगी उपनगराध्यक्ष मो. जाविद, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यव्रत ढोले, उप तालुकाप्रमुख विलास वानखेडे, प्रसाद डोंगरगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुपतेवार, विठ्ठल वानखेडे, सुनील चव्हाण, व्यापारी शांतिलाल श्रीमाळ, अरविंद पाटील, सरदारखान पठाण, नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, बंडू पाटील आष्टीकर, युवासेना तालुकाप्रमुख विशाल राठोड, भावराव वानखेडे, अनिल नाईक, सुरेखा सातव, सदाशिव सातव, अन्वरखान पठाण, अ. गुफरान, सावन डाके, विनायक मेंडके, विजय वळसे, शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड, रवी पाटील, परमेश्वर पानपट्टे, प्रकाश रामदिनवार, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, शंकर चलमेलवार, गजानन दादा चायल, गजानन हरडपकर, गजानन वानखेडे, योगेश चिलकावार, शिवसैनिक दिनेश राठोड, शेख मोहसीन, अरविंद पाटील सीरपल्लीकर, अमोल धुमाळे, प्रशांत हेंद्रे, गजु भाऊ, सालीम शेवाळकर, विनोद खडकीकर, रामदास रामदिनवार, परशुराम आण्णा गौड, अवधूत गायकवाड, राहुल डांगे, सचिन अरेपल्लू, शत्रू हेंद्रे, पत्रकार प्रकाश जैन, ज्ञानेश्वर पंडिलवाड, सोपान बोंपिलवार, दिलीप शिंदे, संजय कवडे, अनिल भोरे, साईनाथ धोबे, गोविंद गोडसेलवार, जांबुवंत मिराशे, परमेश्वर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search