Next
‘कोने’चे पुण्यात नवीन तंत्रज्ञान संशोधन केंद्र
प्रेस रिलीज
Saturday, October 05, 2019 | 02:27 PM
15 0 0
Share this article:

कोने इंडिया कंपनीच्या पुण्यातील टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ‘कोने इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक अमित गोसाई व अन्य अधिकारी

पुणे : कोने इंडिया कंपनीने पुण्यात नवीन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटर कार्यान्वित केले आहे. नुकतेच या केंद्राचे उद्घाटन ‘कोने इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक अमित गोसाई यांच्या हस्ते झाले. संगमवाडी येथील केनेडी रोड येथे हे केंद्र आहे. 

‘कोने इंडिया कंपनीच्या चेन्नई येथील टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग सेंटरचा हा विस्तार असून, (आयटीईसी) एंटरप्राईज मॉनिटरिंग, आयटी सोल्यूशन्ससाठी सेवा व्यवस्थापन व स्मार्ट पीपल फ्लोसोल्यूशन्ससाठी डिजिटल क्षमता विकास, तसेच स्टार्टअप्स व तंत्रज्ञान भागीदारांबरोबर सहनिर्मिती यावर या केंद्रात लक्ष दिले जाईल. या केंद्रामुळे नवीन डिजिटल सेवाक्षेत्र, एंटरप्राईज आयटी या क्षेत्रांमध्ये आपली क्षमता अधिक भक्कम करण्यास कंपनीला मदत होईल. या केंद्रातील कर्मचारी संख्या १२० पर्यंत वाढविण्याची कंपनीची योजना आहे. पुण्यातील या केंद्रात जागतिक दर्जाचे ग्राहक अनुभव केंद्रदेखील असेल,’ अशी माहिती या वेळी अमित गोसाई यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search