पुणे : टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) या भारताच्या आघाडीच्या एंटरप्राइज कनेक्टीव्हीटी सेवा प्रदाता कंपनीने फायबर-ऑप्टिक वितरणासाठी भारताचे उदयोन्मुख स्मार्ट औद्योगिक शहर खेड सिटीसह करार केला आहे.
या करारांतर्गत ‘टीटीबीएस’ प्रांतामध्ये एकमेव सर्वात मोठे फायबर लेआउट प्रकल्प राबवेल; तसेच कंपनी औद्योगिक केंद्रे, उत्पादन केंद्रे, शैक्षणिक संस्था व निवासी संकुलांना एंटरप्राइजेज उत्पादने, डेटा सोल्यूशन्स, वॉइस सोल्यूशन्स, मार्केटिंग सोल्यूशन्स, आयओटी सोल्यूशन्स, व क्लाउड सोल्यूशन्स देईल. हा प्रकल्प ‘वॉक टू वर्क कल्चर’ संकल्पनेवर विकसित करण्यात आलेल्या पुण्याजवळील या व्यापक औद्योगिक शहराचा एक भाग असेल.
या विकासाबाबत बोलताना ‘टीटीबीएस’च्या पश्चिमी भागातील एसएमई कार्यसंचालनांचे प्रमुख मन्नू सिंग म्हणाले, ‘टीटीबीएस लक्षणीय एंटरप्राइज प्रकल्पांच्या व्यवस्थापनासोबतच एंटरप्राइजेजना डिजिटलरित्या पुढे जाण्यामध्ये सक्षम करणाऱ्या आमच्या तंत्रज्ञानक्षम प्रगत टेलिकॉम उत्पादने व सेवांसाठी ओळखली जाते. खेड सिटी हे उदयोन्मुख स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून महत्त्वाचे स्थळ आहे. हा करार एंटरप्राइज क्षेत्रातील आमच्या नेतृत्व स्थितीची पुष्टी देतो.’
खेड सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साधना नाईक म्हणाल्या, ‘आम्हाला ‘टीटीबीएस’सोबत सहयोग जोडताना खूप आनंद होत आहे. कंपनीचा वारसा व अनुभवासह आम्हाला विश्वास आहे की, खेड सिटी हे या देशातील सर्वात प्रगत औद्योगिक शहरांपैकी एक शहर असेल आणि ते आमच्या ग्राहकांना विश्वसनीय, कार्यक्षम व संपन्न अनुभव देईल.’
‘टीटीबीएस’च्या यापूर्वीच्या काही प्रकल्पांमध्ये मगरपट्टा टाउनशिप सेझ, ब्ल्यू रिज सेझ, चाकण– फेज टू व थ्री एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी, रांजणगाव, वर्ल्ड ट्रेड सेंटर, इऑन आयटी पार्क, मिहान आदींचा समावेश आहे.