Next
‘स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयारी आवश्यक’
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, February 28, 2019 | 05:10 PM
15 0 0
Share this story



गडचिरोली : ‘विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित स्वरूपात तयार करून  परीक्षेचा अभ्यासक्रम बघावा. प्रत्येक घटकानुसार अभ्यास करावा. विविध घटकांची माहिती सविस्तर वाचून डोळ्यासमोर चित्र उभे करावे, म्हणजे कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यास सुलभ होते. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी परीक्षाभिमुख तयारी करावी,’ असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले.

गडचिरोली येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. ओंबासे बोलत होते. या वेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जगदीश म्हस्के, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी यांच्यासह वाचक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनाबाबत उपस्थितांना आपल्या मराठी भाषेचे महत्त्व, मराठीत असलेला ज्ञानाचा भांडार याविषयी तपशीलवार माहिती डॉ. ओंबासे यांनी सांगितली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हस्के म्हणाले, ‘मराठी भाषा ही लवचिक आहे, व्याकरणाशी साधर्म्य असलेली ही भाषा गुणवंतांच्या गुणात निश्चितच भर घालेल यात शंका नाही. म्हणूनच वाचनाची आवड निर्माण करून आपल्या ज्ञानाच्या भांडार वृद्धिंगत करावा.’ विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत मार्मिक उदाहरणे देत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

प्रास्ताविक करताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. मडावी यांनी कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन लंकेश मारगाये यांनी केले. आभार श्री. स्वप्नील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूर्यकांत भोसले, रजत सहारे यांचे सहकार्य केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link