Next
सावित्री-ज्योती पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
प्रेस रिलीज
Saturday, April 27, 2019 | 05:02 PM
15 1 0
Share this article:

अहमदनगर : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय लोककला महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, कृषी, आरोग्य या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना राज्यस्तरीय ‘सावित्री-ज्योती गौरव’ सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १० मे २०१९ रोजी अहमदनगरमध्ये होणार असून, मान्यवरांच्या हस्ते सावित्री-ज्योती पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

हे या पुरस्काराचे सलग चौथे वर्ष आहे. सेमी पैठणी साडी, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल. इच्छुक व्यक्तींनी दोन पासपोर्ट फोटोंसह आपल्या कार्याचा थोडक्यात परिचय आयोजकांकडे सहा मेपर्यंत पाठवायचा आहे. समाजात अनेक विषयांच्या माध्यमातून कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न करता अनेकजण अविरत समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन म्हणून सावित्रीज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार निवड समितीमध्ये अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. महेश शिंदे, प्रा. सीताराम जाधव, अ‍ॅड. अमोल जाधव, शिवाजी नवले, प्रा. सुनील मतकर, सचिन गुलदगड, कांतीलाल जाडकर, संध्या देशमुख, रजनी ताठे, पोपटराव बनकर आदींचा समावेश आहे.

प्रस्ताव पाठविण्यासाठी पत्ता : द्वारा जनवार्ता, मार्केटयार्ड, कोठी रोड, पहिला मजला, तालुका पतसंस्था फेडरेशन कार्यालयाशेजारी, अहमदनगर.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search