Next
कलायडोस्कोप
BOI
Monday, January 28, 2019 | 10:14 AM
15 0 0
Share this story

व्यावसायिक कामासाठी जगभर फिरताना विविध अनुभव डॉ. प्रसाद मोडक यांना आले. वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या व्यक्ती भेटल्या, या अनुभवावर त्यांनी ब्लॉगवर लेखन केले. यातील ४० लेखांचा संग्रह त्यांनी ‘कलायडोस्कोप’मधून वाचकांपुढे सादर केला आहे.

‘स्मार्टफोनशिवाय जगता येईल का?’ याचे उत्तर त्यांनी इंद्राच्या दरबारात भरलेल्या देवसभेतील प्रसंगातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्टफोन बंद असल्यास यात पृथ्वीवरील दिग्गजांच्या आयुष्यात काय घडेल याचे मिश्कील वर्णन केले आहे.

वर्कशॉपनिमित्त बांगलादेशला गेल्यावर राष्ट्रगीत गायनातून दिसलेली देशप्रेमाची भावना, विमानप्रवासात अगदी प्रवासी कोणत्या जागेवर बसतात, त्यावरून त्यांची केलेली पारख, व्हिव्हियन रिचर्ड्स, अमिताभ बच्चन, रतन टाटा या दिग्गजांबरोबर प्रवासातील अनुभव, ३० मिनिटांनी मरण येणार असल्याचे समजल्यावर आठवलेले ब्रह्मांड, हाँगकाँगमध्ये भेटलेली बाइक या मैत्रिणीच्या आठवणी, असे सारे काही यातील लेखांमध्ये आहे. याचा मराठी अनुवाद ललिता मोदक यांनी केला आहे.       

पुस्तक : कलायडोस्कोप
लेखक : प्रसाद मोडक
अनुवादक : ललिता वैद्य
प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन
पाने : २३८
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link