Next
अनिरुध्द जोशी ठरला राजगायक
प्रेस रिलीज
Monday, April 09, 2018 | 05:33 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘कलर्स मराठी’वरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. या कार्यक्रमात अनिरुध्द जोशी याने ‘सूर नवा ध्यास नवा’चा राजगायक होण्याचा मान पटकावला.

कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सना, तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला, कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १५ स्पर्धकांबरोबर सुरू झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी-देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर. या स्पर्धकांमध्ये रंगला महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्यामध्ये रंगली गाण्याची मैफल आणि रंगले संगीत युध्दविजेतेपद जिंकण्यासाठीचे आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाला नवीन सूर महाराष्ट्राचे भावगंधर्व संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते ‘सूर नवा ध्यास नवा’च्या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले.

अनिरुध्द जोशी याने राजगायक होण्याचा मान पटकावला. त्याला ‘कलर्स मराठी’तर्फे दोन लाख रुपये, मानाची कट्यार मिळाली; तसेच केसरी टूर्सतर्फे ऑस्ट्रेलियाचा दौरा, तर निहिरा जोशी, प्रेसेनजीत कोसंबी, शरयू दाते आणि विश्वजित बोरवणकर या उपविजेत्यांना पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश मिळाला.

कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कलर्स’च्या परिवारातील प्रेक्षकांचे लाडके कलाकार उपस्थित होते. ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘घाडगे अँड सून’ तसेच ‘सरस्वती’ मालिकेमधील कलाकारांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये हजेरी लावली. तसेच वायकॉम१८ मोशन पिक्चर्सचा आगामी चित्रपट ‘सायकल’ची टीम प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी आणि मैथिली पटवर्धन हे देखील महाअंतिम सोहळ्यास हजर होते. प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी यांनी एक धम्माल स्कीट देखील साजर केले. तसेच ‘रणांगण’ चित्रपटाची टीम स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग उपस्थित होते.

राजगायक हा मान पटकावल्यानंतर अनिरुध्द म्हणाला, ‘सूर नवा ध्यास नवा आणि कलर्स मराठीचे खूप आभार त्यांनी या प्रकारचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला आणि या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी गायकांना स्पर्धक म्हणून आणले. खरे सांगायचे, तर या कार्यक्रमामध्ये स्वत:शीच स्वत:ची स्पर्धा होते, असे मी म्हणेन. जिंकणे अजिबात सोपे नव्हते; परंतु या कार्यक्रमामुळे मला हे समजले की, मी वेगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकतो. ही संधी मला याच मंचाने दिली. राजगायक हा मान मिळाल्यानंतर आणि सूर नवा हा कार्यक्रम जिंकल्यावर मला नवीन गाणी, गाण्यामध्ये नवनवे प्रयोग करण्याची इच्छा आहे. या कार्यक्रमाने ज्या गोष्टी शिकविल्या त्यांचा आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील फायदा होईल, असे मला वाटते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link