Next
‘लायगो इंडिया’साठी हिंगोलीतील जागा मंजूर
खासदार अनिल शिरोळे यांच्या पाठपुराव्याला यश
प्रेस रिलीज
Thursday, January 03 | 05:03 PM
15 0 0
Share this story

पुणे : गुरूत्वीय लहरींच्या शोधासंबंधीच्या ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झरव्हेटरी’ (लायगो इंडिया) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास हिंगोली जिल्ह्यातील १२१.८३ हेक्टर जागा मंजूर झाली आहे. या जागेस मंजुरी मिळावी आणि प्रकल्पाचा मार्ग लवकर मोकळा व्हावा यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

पुण्यातील ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेने इतर काही विज्ञान संशोधन संस्थांसह देशभर या प्रकल्पासाठीच्या जागेचा शोध घेतला होता. त्यातून हिंगोलीतील ही जागा प्रकल्पासाठी योग्य असल्याचे समोर आले. पर्यावरण मंत्रालयाने हिंगोलीतील १२१.८३ हेक्टरची पडीक वनजमीन ‘लायगो इंडिया’ला देण्यास मान्यता दिल्यामुळे हा प्रकल्प पुढे जाण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link