Next
थायलंड फुटबॉल टीमच्या सुटकेत किर्लोस्कर ब्रदर्सचे योगदान
प्रेस रिलीज
Thursday, July 05 | 05:23 PM
15 0 0
Share this story

पुणे : थायलंडमध्ये गुहेत अडकलेले बारा फुटबॉल खेळाडू मुले व त्यांच्या प्रशिक्षकांची सुटका करण्याच्या मदतकार्यात किर्लोस्कर ब्रदर्स तंत्रज्ञान सहाय्य करत आहे. 

थायलंडमधील ‘द इंडियन एम्बेसी’ने जारी केलेल्या निवेदनानुसार, किर्लोस्कर ब्रदर्स कंपनी पुराचे पाणी बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान कौशल्य वापरत असून, मुलांची सुखरूप सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न  केले जात आहेत. 

मुसळधार पावसामुळे थायलंडच्या चियांग राय परिसरात पूरसदृश स्थित निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही थॉम लुआंग गुहेकडे जाण्याचा मार्ग निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 

बँकॉकमधील भारतीय अॅम्बेसेडर भगवंत सिंग बिश्नोई म्हणाले, ‘सध्या मुले ज्याठिकाणी अडकली आहेत तेथून त्यांची सुखरूप सुटका करण्याचे आव्हान आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडची थायलंडमध्ये उपकंपनी आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान कौशल्याची मदत केली आहे. त्यांनी २०११ मध्ये बँकॉकमध्ये आलेल्या पुरानंतरच्या स्थितीत थायलंडमध्ये अनेक प्रकल्प राबवले आहेत. या स्थितीत जे काही करणे शक्य आहे, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link