Next
बीएमडब्ल्यू गाड्यांचे भारतात एकत्रित पदार्पण
प्रेस रिलीज
Saturday, February 10, 2018 | 12:28 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : बीएमडब्ल्यू मिनी व बीएमडब्ल्यू मोटोर्राड हे अद्वितीय प्रॉडक्ट ऑफेन्सिव्हसह पहिल्यांदाच भारताच एकत्रितपणे पदार्पण करत आहेत. बीएमडब्ल्यू इंडियाने ‘ऑटो एक्स्पो २०१८’मध्ये बहुप्रतिक्षित नवी बीएमडब्ल्यू सिक्स सीरीज ग्रॅन टूरिझ्मो व ऑल-न्यू बीएमडब्ल्यू एम फाइव या नवीन गाड्या लाँच केल्या.
 
बीएमडब्ल्यू पॅव्हेलियनमध्ये दिग्गज स्पोर्ट्समन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते नवी बीएमडब्ल्यू सिक्स सिरीज ग्रॅन टूरिझ्मो लाँच करण्यात आली. नवी बीएमडब्ल्यू सिक्स सिरीज ग्रॅन टूरिझ्मोचे चेन्नईमधील बीएमडब्ल्यू प्लांटमध्ये उत्पादन करण्यात आले आहे.
 
ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आलेली ऑल-न्यू बीएमडब्ल्यू एम फाइव कम्प्लिटली बिल्ट-अप युनिट म्हणून उपलब्ध आहे. या गाडीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातील एम स्पेसिफिक ऑल व्हिल ड्राईव्ह सिस्टिम. ही गाडी रेस ट्रॅक, तसेच खुल्या मार्गावरही चालवता येते. 

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह म्हणाले, “तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून संपूर्ण जगभरात बीएमडब्ल्यू एम फाइव ही सर्वात स्पोर्टिंग आणि डायनॅमिक एक्झिक्युटिव्ह सेडान मानली जाते. आपल्या मजबूत परफॉर्मन्सचे मूळ स्वरूप व त्याच वेळी आधुनिक गाडीसाठी आवश्यक असणारा मोटर रेसिंग हेरिटेज व एलिगेंट स्पोर्टी रूप मिळालेली गाडी अशी हिची ओळख आहे. दररोजच्या वापरासाठी बिझिनेस सेडान म्हणून पूर्णपणे सक्षम असलेली ही गाडी हाय परफॉर्मन्स सुपर स्पोर्टस् कार म्हणूनही आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करते.”
 
वर्ष २०१८च्या आगामी महिन्यांमध्ये भारतात लाँच करण्यात येणाऱ्या  नेक्स्ट-जनरेशन बीएमडब्ल्यू एक्स थ्री, हाय-परफॉर्मन्स हायब्रिड व्हेइकल ऑल-न्यू बीएमडब्ल्यू आय एट, रोडस्टर या गाड्यासुद्धा या प्रदर्शनात सादर करण्यात आल्या.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search