Next
केटूएल सायकल मोहीम पुण्यात; प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार
प्रेस रिलीज
Wednesday, June 06, 2018 | 12:15 PM
15 0 0
Share this storyपुणे :
‘भीतीवर मात करा’ असा संदेश महिलांना देत कन्याकुमारी ते लेह (केटूएल) अशा दक्षिणोत्तर सायकल प्रवासाला निघालेल्या प्रा. वासंती जोशी यांचे मंगळवारी, पाच जून रोजी पुण्यात आगमन झाले. ‘लायन्स क्लब ऑफ पुणे औंध-पाषाण’च्या वतीने मंगळवारी रात्री मोहिमेचे स्वागत करण्यात आले आणि सायकलस्वार प्रा. वासंती जोशी आणि त्यांच्या चमूतील शुभदा जोशी, केतकी जोशी, गायत्री फडणीस यांचाही सत्कार करण्यात आला. 

‘लायन्स क्लब’चे प्रांतपाल रमेश शहा, ‘लायन्स क्लब ऑफ पुणे औंध-पाषाण’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, अॅड. सतीश धोका यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मोहिमेसाठी आर्थिक मदतीचा धनादेशही देण्यात आला. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, काका धर्मावत, प्रदीप बर्गे या वेळी उपस्थित होते. हा स्वागत कार्यक्रम गिरिकंद ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात करण्यात आला. 

२८ मे रोजी कन्याकुमारीहून ही मोहीम सुरू झाली असून, ‘कॉन्करिंग फीअर’ असा संदेश या मोहिमेतून महिलांना दिला जात आहे. दररोज किमान १५० किलोमीटर सायकलिंग केले जात असून, या मोहिमेची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद होणार आहे. प्रा. वासंती जोशी या पुण्यातील एसएनडीटी विद्यापीठात अकाउंट्स विषयाच्या प्राध्यापक आहेत. महर्षी कर्वेंनी स्थापन केलेल्या या संस्थेचा स्थापना दिन पाच जुलै रोजी असून, त्यांनी महिलांप्रति केलेल्या योगदानाला मानवंदना म्हणून या मोहिमेचा समारोप त्या दिवशी होणार आहे. लेहमधील उमलिंग ला या खिंडीत जाणाऱ्या त्या पहिल्या सायकलस्वार ठरणार असून, ही खिंड समुद्रसपाटीपासून १९ हजारहून अधिक फूट उंचावर आहे. सहा जून रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत प्रा. जोशी ‘एसएनडीटी’मध्ये पुणेकरांना भेटणार आहेत, असे शुभदा जोशी यांनी सांगितले. 

(या मोहिमेपूर्वी घेतलेली प्रा. वासंती जोशी यांची मुलाखत आणि मोहिमेविषयीची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांच्या मोहिमेतील काही टप्प्यांचे व्हिडिओही सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link