Next
रावसाहेब पाटील दानवे यांनी केले वायुसेनेचे अभिनंदन
BOI
Wednesday, February 27, 2019 | 12:27 PM
15 0 0
Share this article:

रावसाहेब पाटील दानवेमुंबई : ‘भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या जैश-ए-महंमदचा पाकव्याप्त काश्मीरमधील तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम,’ अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, ‘पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर हा हल्ला करणारे व त्यांना मदत करणारे, यांच्यावर कारवाई करण्यास सरकारने सैन्याला पूर्ण मोकळीक दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. गुप्तचरांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे भारतीय हवाई दलाची विमाने यशस्वी कामगिरी करून सुरक्षित परतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वात देश सुरक्षित असल्याचे या वेळी दिसून आले.’

‘भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी कारवाया सहन करणार नाही आणि नवा भारत दहशतवादमुक्त असेल हे या कारवाईवरून दिसून आले,’ असेही दानवे यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search