Next
लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे सहाशेहून अधिक मुलींना शिष्यवृत्ती
BOI
Monday, December 03, 2018 | 02:57 PM
15 0 0
Share this article:

लीला पुनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती प्रदान समारंभप्रसंगी फिरोज पूनावाला, निहीलंटचे अध्यक्ष मिनू दस्तूर, लीला पूनावाला, रश्मी दवे,  वृषाली गौड़ आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे (एलपीएफ) पुणे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या सहाशे मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. 

अल्पबचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमात, सकाळी पहिल्या सत्रासाठी निहीलंटचे अध्यक्ष मिनू दस्तूर आणि १९९८ मध्ये लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या आणि आता पर्सिस्टंट सिस्टम्समध्ये टेक्नीशियन एक्सपर्ट म्हणून कार्यरत असलेल्या रश्मी दवे उपस्थित होत्या, तर दुपारच्या सत्रामध्ये टाटा टेक्नोलॉजीजचे कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी विभागाचे प्रमुख विक्रांत गांधी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार व लीला पूनावाला फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीधारक वृषाली गौड़ उपस्थित होत्या. 


या वेळी उपस्थित पाहुण्यांनी पालकांना त्यांच्या मुलांना शिक्षित करण्याचे महत्त्व सांगितले. आपले विचार व्यक्त करताना लीला पूनावाला म्हणाल्या, ‘शिक्षित मुली बहुआयामी असतात. त्यांच्याकडे सर्व जबाबदाऱ्या हाताळण्याची क्षमता असते. मुलींना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, तसेच त्यांनी निवडलेले आयुष्य जगण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search