Next
‘लेक्सस इएस ३००एच’ भारतात दाखल
प्रेस रिलीज
Tuesday, July 24, 2018 | 12:08 PM
15 0 0
Share this story

पुणे : मध्यम आकाराच्या सेदान वर्गवारीमध्ये सातव्या पिढीची लेक्सस इएस आता एक्झिक्युटिव्ह सेदानमध्ये आपले स्थान नव्याने स्थापित करण्यासाठी सज्ज झाली आहे. २.५ लिटर, फोर सिलेंडर पेट्रोल इंजिनासोबत नवीन लेक्सस हायब्रिड ड्राइव्ह सिस्टिम आणि हायब्रिड इएस ३००एच भारतात सादर करण्यात आली आहे.

नवीन ‘इएस ३००एच’मध्ये ग्लोबल आर्किटेक्चर- के (जीए-के) प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे याची जास्त ताकद आणि प्रमाणबद्धता त्याच्या कामगिरीच्या क्षमतांमध्ये प्रतिबिंबित होते आणि आकर्षक एल आकाराच्या मार्कर लाइटसोबत सडपातळ एलईडी हेडलँप्स या ‘इएस ३००एच’ला एक आकर्षक नवीन रूप देतात. ‘लेक्सस’ची आकर्षकता कायम ठेवतानाच प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास हा इएस श्रेणीचा हॉलमार्क सातव्या पिढीतही कायम राहिला आहे.

चालकाचे कंट्रोल पॅनल आणि डिस्प्ले चालकाच्या आणखी जवळ आणण्यात आले आहे आणि त्यातून पुढे बसणाऱ्या प्रवाशांना जास्त जागा मिळते; तसेच आरामदायी प्रवासाची हमी मिळते. मागच्या सीटवरच्या प्रवाशांना मोठ्या व्हीलबेसमुळे ९९८.६ मिमीच्या वाढीव लेगरूममुळे तितक्याच आरामदायी प्रवासाची खात्री मिळते. ह्युमन सेंटर्ड डिझाइन तत्त्वांनी तयार झालेल्या कॉन्सोलवरील क्लायमेट आणि ऑडिओ कंट्रोल व एडजस्ट करण्यायोग्य आणि हीटेड सेमी- एनिलाइन सीट्स आणि १७ स्पीकर मार्क लेविन्सन प्युअर प्ले सिस्टिममधून संगीताचा आनंद घेता येईल.  

लेक्सस इंडियाचे अध्यक्ष एन. राजा म्हणाले, ‘लेक्सस इएस ही आमच्या अत्यंत लाडक्या गाड्यांपैकी एक आहे आणि या नवीन पिढीच्या मॉडेलची बांधणी अशा रितीने करण्यात आली आहे की त्यातून अत्यंत शक्तिशाली व आकर्षक अनुभव मिळतो आणि त्याचबरोबर ही गाडी देखणी व अत्याधुनिक दिसते. नवीन ‘लेक्सस इएस३००एच’चे अनावरण जास्त आकर्षकता, पॅशन आणि नाविन्यपूर्णतेसोबतच गाडीची निर्मिती करण्याबाबत आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे आणि ही गाडी आमच्या पाहुण्यांना विविध प्रकारचे पर्याय देईल. त्यातील प्रत्येकाची रचना अत्यंत काळजीपूर्वक केली गेली असून सर्वोत्तमतेचा दर्जा साध्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.’

‘इएस ३०० एच’मध्ये एक नवीन चौथ्या पिढीची हायब्रिड ड्राइव्ह सिस्टिम आहे. युरो सिक्स पूर्तता करणारी नवीन हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टिम आणि त्यातील फोर सिलेंडर पेट्रोल इंजिनमुळे सुधारित लिनियर एक्सिलरेशन मिळते, एकत्रित १६० किलोवॅट शक्ती आणि २२.३७ किमी प्रतिलीटर मायलेज मिळते. ‘इएस ३०० एच’मध्ये आघाडीच्या १० एअरबॅग्स, हिल स्टार्ट असिस्ट, व्हेइकल स्टॅबिलिटी कंट्रोल आणि अँटी थेफ्ट सिस्टिम, ब्रेक इन आणि टिल्ट सेन्सर्स आहेत. नवीन ‘इएस ३०० एच’मध्ये ड्रायव्हरचा आरामदायीपणा व ड्राइव्ह करण्यातील सोपेपणा प्रवाशांच्या आरामदायीपणाइतकाच महत्त्वाचा आहे आणि यातील कॉकपिटमध्ये सात इंची एलईडी इन्स्ट्रुमेंट पॅनल आणि मोठे एनॉलॉग टेकोमीटर, डिजिटल स्पीडोमीटर आणि वाचण्यास सोपा मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, तसेच पूर्णपणे अॅडजस्ट करण्यासारखा कलर हेड्स अप डिस्प्ले आहे. यातील १२.३ इंची इलेक्ट्रो मल्टी व्हिजन (इएमव्ही) फुल साइज डिस्प्लेवरील नेव्हिगेशन सिस्टिम आणि नवीन इएसमधील वायरलेस चार्जर यांच्यामुळे गाडी रस्त्यावर असताना लक्ष विचलित होत नाही. नवीन रॅक असिस्ट टाइप इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंग (इपीएस) सिस्टिममुळे अचूक स्टीअरिंग इनपुट्स मिळतात आणि इएसमधून ड्राइव्ह मोड सिलेक्ट सिस्टिम मिळते. त्यामुळे चालकाला कारच्या सेटिंग्स बदलत्या रस्त्याच्या परिस्थितीत इको, नॉर्मल आणि स्पोर्टस् मोडवर नेता येतात. पुढील बाजूस मॅकफर्सन स्ट्रट्स, ट्रेलिंग आर्म आणि मागील बाजूस मल्टीलिंक सेटअप प्रत्येक बाजूला स्टॅबिलायझर बारसोबत आहे. त्यासोबत १८ इंची मल्टी स्पोक अलॉय चाके असून, त्यामुळे अचूक हँडलिंग होते आणि इएस अत्यंत आरामदायी व शांत कार ठरते. नव्याने तयार कऱण्यात आलेल्या रेअर सस्पेंशनमुळे कार्गो रूम वाढली आहे आणि नवीन इएस ३०० एचमध्ये ४५४ एल कार्गो जागा ऑटो ओपन ट्रंकसोबत आहे आणि तीही पूर्ण आकाराच्या जास्तीच्या चाकामध्ये बसते.

अंतर्गत वैशिष्टयांमध्ये चार रंग आणि तीन प्रकारचे ट्रिम्स आहेत. त्याचबरोबर बाह्य रूपावर नऊ आकर्षक रंगही उपलब्ध आहेत. ब्लॅक, चॅटू आणि टोपाझ ब्राउनसोबत इएसमध्ये हलके नवीन रिच क्रीम इंटिरियर आहे, जे डीप ब्राउन डॅश आणि रूफ ट्रिमला अत्यंत आकर्षक काँट्रास्ट देते. इएसमध्ये सिमामोकू वूड ट्रिमच्या (ब्लॅक, ब्राउन) दोन शेड्स तसेच हलक्या बांबूचा रंगही आहे. नवीन इएसमध्ये टाकुमी कारागिरी दिसते, जी इन्स्ट्रुमेंट पॅनलच्या मऊसूत पॅडलमध्ये असून, यातील प्रत्येक शिवण ही ३-डी इफेक्टसाठी मटेरियलमध्ये आहे.   

लेक्सस इंडियाचे अध्यक्ष पी. बी. वेणुगोपाल म्हणाले, ‘नवीन ‘लेक्सस इएस३००एच’मुळे आराम व सौंदर्य एका नवीन स्वरूपात दिसते आणि आपल्या वर्गात नवीन आदर्श घालून देणारी गाडी आपल्याला मिळते. ‘इएस३००एच’मधील प्रत्येक घटक हा ‘लेक्सस’सारखे दुसरे काहीही नाही याची आठवण करून देणारा आहे. सडपातळ नवीन लुकपासून ते अत्यंत आकर्षक आंतररचनेपर्यंत ‘इएस३००एच’ ही आपल्या कामाच्या माध्यमातून यश आणि कामगिरी यांच्या निकषांची नवीन व्याख्या करणाऱ्या पाहुण्यांसाठी अचूक निवड आहे.’
 
‘लेक्सस इएस३००एच’ १९ जुलै २०१८ पासून ५९ लाख १३ हजार रूपये किंमतीत भारतभर (एक्स-शोरूम) बुकिंगसाठी उपलब्ध असेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link