Next
‘मधुरिता’च्या तपपूर्ती महोत्सवास प्रारंभ
प्रेस रिलीज
Friday, February 08, 2019 | 12:49 PM
15 0 0
Share this article:



पुणे : मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या तपपूर्ती महोत्सवास सहा फेब्रुवारी २०१९ पासून सायंकाळी प्रारंभ झाला. या वेळी प्रख्यात तबलावादक पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर यांची विशेष उपस्थिती  होती.

सहा ते आठ फेब्रवारी या कालावधीत हा तपपूर्ती महोत्सव पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात तीन दिवसांचा कलात्मक जल्लोष, सारंग सन्मान प्रदान, स्मरणिका प्रकाशन आणि कथ्थक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी ६.४५ वाजता होतील.

‘मधुरिता’च्या संस्थापक-संचालक प्राचार्या अर्चना संजय यांनी स्वागत केले. सहा फेब्रुवारीला मनीषा साठे, अर्चना संजय या नृत्यगुरूंच्या संरचना ‘अभिव्यक्ती’ या नृत्याविष्कारांतर्गत सादर करण्यात आल्या. ‘झनक झनक पायल बाजे’ गीतावरील वरील नृत्य सादर करण्यात आले. तपपूर्ती वर्षानिमित्त १२ वर्षे वयाच्या विद्यार्थिनींनी शिववंदना सादर केली. रोहिणी भाटे यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांची रचना असलेली ‘नटवरी त्रिवेणी’ सादर करण्यात आली. या सर्व नृत्याविष्कारांना चांगला प्रतिसाद मिळाला. ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकातील रचनाही या वेळी सादर करण्यात आल्या. शेवटी अभिषेक गावडे यांनी तराणा सादर केला.  

सात फेब्रुवारीला म्हणजेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘अभिजात’ या अविष्कारांतर्गत सारंग सन्मान प्रदान समारंभ आणि पंडित राजेंद्र गंगाणी, पंडित योगेश शमसी यांची विशेष प्रस्तुती आयोजित करण्यात आली. यंदाच्या तपपूर्ती सारंग सन्मानाच्या मानकरी ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता मनीषा साठे या होत्या. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.


तपपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन कलासमीक्षक आणि पुणे लोकसत्ताचे संपादक मुकुंद संगोराम, माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळ, कायदेतज्ज्ञ, वक्त्या आणि तपपूर्ती सोहळ्याच्या स्वागताध्यक्ष ॲड. शीतल चव्हाण यांच्या हस्ते झाले.



आठ फेब्रुवारीला ‘अभिनव’ या अविष्कारांतर्गत एकल नृत्य प्रस्तुती सादर होणार आहे. त्यात वल्लरी आपटे, सुजाता गावडे, दीक्षा त्रिपाठी, राजश्री घोंगडे, सिद्धी पोटे या नृत्य सादर करतील. समारोप सोहळ्यास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, विश्व मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड आणि दिग्दर्शक संजय सिंगलवार यांची उपस्थिती असणार आहे.

तपपूर्ती महोत्सवाच्या तीनही दिवशी नृत्यगुरू अर्चना संजय यांच्या शिष्या कथ्थक नृत्य सादर करणार आहेत. त्यांना चारुदत्त फडके (तबला), समी उल्लाह खान (हार्मोनियम आणि गायन), नितीश पुरोहित (सरोद), रश्मी मोघे (गायन), तुषार घरत (पखवाज), संगीत मिश्रा (सारंगी) हे साथसंगत करीत आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search