Next
‘फोटोग्राफी ऑन व्हील्स’ कार्यशाळेचे आयोजन
BOI
Wednesday, March 06, 2019 | 12:43 PM
15 0 0
Share this article:

सुधारक ओलवेरत्नागिरी : प्रख्यात छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्यासह पर्यटन आणि छायाचित्रणाच्या ‘फोटोग्राफी ऑन व्हील्स’ या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी रत्नागिरीकरांना उपलब्ध झाली आहे.

या कार्यशाळेअंतर्गत छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांनी पाच सोशल डॉक्युमेंटरी, फोटोग्राफी वर्कशॉप्स आयोजित केले आहेत. या अंतर्गत ते स्वत: त्यांच्या काही सहकाऱ्यांसह महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची अभ्यासपूर्ण भ्रमंती करणार आहेत. या दरम्यान त्यांच्यासोबत कार्यशाळेत फोटोग्राफी शिकण्याची संधी छायाचित्रकारांना मिळणार आहे. तसेच गावागावांतून होणाऱ्या या कार्यशाळेतून बरेच काही अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्रासह भारतीय संस्कृतीचा मागोवा घेत तेथील सामाजिक आणि सांस्कृतिक वैविध्ये टिपत ‘फोटोग्राफी ऑन व्हील्स’ ही मोबाइल व्हॅन राज्यातील तसेच भारतातील गावागावांमधून आणि छोट्या शहरांमधून प्रवास करणार आहे. जनमानसातील कथांपर्यंत पोहोचून त्यांचे डॉक्युमेंटेशन करत, वाटेत भेटणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधत, त्यांच्यात आणि फोटोग्राफीमध्ये नवा दुवा साधत या कार्यशाळेचा एका प्रवास एका वेगळ्याच वाटेने होणार आहे. या माध्यमातून छायाचित्रणासारख्या सशक्त कलेतून समाजमनाचा वेध घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोकण प्रांतात व कोल्हापूर जिल्ह्यातील काही अनोख्या ठिकाणी छायाचित्रे काढण्याची संधी, स्थानिक लेखक, पत्रकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि छायाचित्रकारांना भेटून त्यांच्याशी बोलण्याची संधी, ग्रामीण महाराष्ट्राची ओळख आणि डॉक्युमेंटेशन करण्याची संधी या माध्यमातून छायाचित्रकारांना मिळणार आहे. या कार्यशाळेत केवळ ३५ जणांना सहभागी होता येणार आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ५०० रुपये शुल्क असून, जेवण आणि राहाण्याची सोय केली जाणार आहे. या सर्व प्रवासादरम्यान पद्मश्री ओलवे कार्यशाळा घेणार असून, यात ते छायाचित्रणामधील एक वेगळ्या दृष्टिकोनाबद्दल मार्गदर्शन करतील. ते स्वतः सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने छायाचित्रणाच्या सामाजिक सहभागाबद्दलही आणि सामाजिक कार्यात छायाचित्रकारांचा सहभाग किती महत्त्वाचा असू शकतो यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.

रत्नागिरीमधील कार्यशाळेसाठी संपर्क
सिद्धेश :
९९७०२ ४५९६२
ई-मेल : lensartratnagiri@gmail.com
इतर ठिकाणी होणाऱ्या कार्यशाळेसाठी संपर्क :
नीलेश :
९६७३९ ९४९८३
ई-मेल : photography.ppt@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search