Next
ट्रस्ट आणि कंपनी कायदा सल्लागार केंद्राचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, October 20, 2018 | 01:23 PM
15 0 0
Share this article:

पुणे : क्रेडिट मॅनेजमेंट सर्व्हिसेसतर्फे (सीएमएस) विश्‍वस्त संस्था (ट्रस्ट), बँक, कंपन्या यांना कंपनी कायदा व इतर उपयुक्त सल्ला सेवा देणार्‍या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ व्यवस्थापन गुरू डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले.

या प्रसंगी बिझनेस एथिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्री. ग. बापट, वारजे येथील पटेल हायस्कूलचे अध्यक्ष शानू पटेल, टाटा ग्रुपचे माजी महाव्यवस्थापक सुनील पटेल, ‘सीएमएस’चे मुख्य विपणन कार्यकारी विनायक देशपांडे, आनंद परांजपे, निशिकांत देशपांडे, उदयन देशमुख उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. शेजवलकर म्हणाले, ‘ट्रस्ट, कंपन्या चांगले चालण्यासाठी सकारात्मक मानसिकता असावी. हेतू चांगला असावा, सेवा हा उद्देश असावा. नव संकल्पनांचा अंगीकार करावा.’

डॉ. बापट म्हणाले, ‘अविश्वासाचा पाया असलेले व्यवहार, व्यवसाय टिकत नाहीत. म्हणून सकारात्मक प्रगतीसाठी कंपन्या आणि ट्रस्टना सल्ला सेवेची आवश्यकता आहे.’
 
‘ट्रस्ट म्हणजे विश्‍वस्त संस्था या कल्पनेचा स्वीकार अजून कृती आणि बंधनकारक म्हणून मनापासून स्वीकारलेला नाही. विश्‍वस्ताची भूमिका ही मुख्य संरक्षकासारखी असून, ती एक नैतिक सामाजिक जबाबदारी आहे. ‘ना नफा ना तोटा’ हे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या विश्‍वस्त संस्थेला काही नोंदी ठेवणे बंधनकारक असते. या सर्व बाबींवर केंद्रातर्फे अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे,’ अशी माहिती या वेळी देण्यात आली.

थकीत कर्जासाठी सल्ला, अर्बन बँकांना स्टाफसहित संचालकांना प्रशिक्षण, आर्थिक पुनरुज्जीवन आदींबाबतही ‘सीएमएस’चे कार्य सुरू आहे. या केंद्रात प्रमुख सल्लागार म्हणून ‘बिझनेस एथिक्स’चे डॉ. बापट काम पाहणार आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ बँक स्टाफ प्रशिक्षक म्हणून माजी आरबीआय उपमहाप्रबंधक प्रा. श्रीधर नागनूर (मुंबई), जनार्दन कुलकर्णी, प्रदीप भावे (ठाणे), माधव गोखले, निशिकांत देशपांडे, म. वि. गोडसे, मनोहर जोशी आणि अविनाश केतकर (सोलापूर) हे काम पाहणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search