Next
‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात
पारंपरिक दिनानिमित्त शिवरायांना मानवंदना
प्रेस रिलीज
Thursday, March 14, 2019 | 01:13 PM
15 0 0
Share this article:इचलकरंजी : ‘डीकेटीई’मध्ये ‘जोश २०१९’ या वार्षिक स्नेहसंमेलनाला पारंपरिक दिनाने उत्साहात सुरुवात झाली. दर वर्षी विविध संकल्पना राबवून ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांमार्फत भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविले जाते.

या वर्षी विद्यार्थ्यांनी पांरपरिक वेषभुषेत हजेरी लावली व सर्व कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडविले. शिवकालीन प्रसंग सकारतानाच त्याला पारंपरिक वेषभूषेची जोड देत हा दिवस वेगळया पद्धतीने साजरा केला. ‘जोश २०१९’चे उद्घाटन शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. या वेळी संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे, डायरेक्टर व प्राचार्य प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर (प्रशासकीय) प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डेप्युटी डायरेक्टर (शैक्षणिक) प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ए. व्ही. शहा, प्रा. व्ही. आर. बलवान, प्रा. ए. यू. अवसरे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा. सचिन कानिटकर यांनी सूत्रसंचलन करतानाच शिवकाळ व पारंपरिक पोषाख या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. त्यात शिवाजी महाराज, मावळे, तुकाराम महाराज, झांशीची राणी, साधू, संत, सैनिक आदी विविध वेषभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. रविना निंबाळकर व ग्रुपने शिवजन्माचा अप्रतिम प्रसंग व ‘बाळ शिवाजीचा पाळणा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. महाराष्ट्र बॉडी बिल्डर ‘डीकेटीई’ यश बाकरे याने आपली कला सादर केली.

‘डीकेटीईच्या’च्या वार्षिक स्नेहसंमेलनात पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी.

मूल पाठीशी बांधून लढाई केलेल्या झाशीच्या राणीची युद्धकला सादर करण्यात आली. त्यानंतर लाठीकाठीचे डाव विद्यार्थ्यांनी सादर केले. शिवाजी महाराजांच्या वेषभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांने ‘शिवाजीचा छावा संभाजी’ या नाटकातील संवादाने सर्वांची मने जिंकली त्यानंतर विद्यार्थ्यांनी ढोलवादनातून कवी भूषणाची रचना सादर केली. विजय गोंधळी यांनी शिवकालीन पाळणा सादर केला. या सर्व गोष्टींनी ‘डीकेटीई’च्या राजवाड्यात अनेक शिवकालीन प्रसंग जिवंत झाले व सर्व वातावरण छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय आदी घोषणांनी भारावून गेले.प्रा. सचिन कानिटकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थी प्रतिनिधी दीपक कडवा, शुभम धोत्रे, सातपुते व पवनपुरी गोस्वामी यांनी पारंपरिक दिवसाच्या आयोजनासाठी सक्रिस सहभाग घेतला.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search