Next
‘संगीतामुळे मी आजही तरुण’
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते ऋत्विक फाउंडेशनची स्थापना
प्रेस रिलीज
Monday, November 19, 2018 | 04:16 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘गुरुकुलची स्थापना करताना अनेक अडचणी आल्या, अशावेळी आपल्यासारख्या माय-बाप रसिकांची आणि संगीताची उपासना करणाऱ्या संस्थांची साथ मिळाली. विद्यार्थ्यांना गुरुकुलात शिकविण्यात एका वेगळा आनंद मिळतो. संगीतामुळे आजही नवी उमेद मिळते, म्हणूनच मी आज वयाच्या ८० व्या वर्षी देखील स्वत: तरुणच समजतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी केले.

प्रवीण कडले यांच्या ऋत्विक फाउंडेशनची स्थापना पंडितजींच्या हस्ते करण्यात आली. यानिमित्ताने ‘स्वर-प्रभात’ या मैफिलीचे आयोजन बालशिक्षण सभागृहात करण्यात आले होते. याच वेळी पंडितजींच्या ८०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, पंडित सत्यशील देशपांडे, पंडित मुकुल शिवपुत्र, पंडित रघुनंदन पणशीकर, ऋजुता सोमण कल्चरल अकादमीच्या ऋजुता सोमण, तबलावादक विजय घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.‘ऋत्विक’चे संस्थापक अध्यक्ष कडले म्हणाले, ‘भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेची जपणूक करून व ती नवीन पिढीपर्यंत पोचविण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.’

तालयोगी पंडित तळवलकर म्हणाले, ‘शास्त्र हे समजावले जाते, तंत्र हे शिकवले जाते, विद्या ही दिली जाते आणि कला ही संस्कारित केली जाते. कोणताही कलाकार गुरुंमुळे घडत असतो, कारण गुरु आपली कला विद्यार्थ्यांना संस्कारित करून देत असतात.’

सादरीकरण करताना पंडित मुकुल शिवपुत्र

या वेळी पंडित मुकुल शिवपुत्र यांनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिवपुत्र यांनी आलापपासून सुरुवात करताना बिलावत व बिलावत तोडीमधील ‘जाओ जाओ बतिया... बलम के पास... देखी तेरी प्रीत... न बताओ बतिया...’ ही बंदिश सादर केली. त्यांना मंदार पुराणिक यांनी तबला, भूपाल पणशीकर यांनी सतार, ऋतुजा फुलकर व आशिष मैड यांनी तानपुऱ्यावर साथ-सांगत केली.

कडले यांनी प्रस्तावना केली. सोमण यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search