Next
‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ १२ ते १४ डिसेंबर दरम्यान
BOI
Monday, December 10, 2018 | 03:11 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चाच एक महत्त्वाचा भाग असलेला ‘षड्ज’ हा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारीत चित्रमहोत्सव, तसेच ‘अंतरंग’ हा ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम या वर्षी बुधवार, १२ डिसेंबर ते शुक्रवार,१४ डिसेंबर २०१८ दरम्यान पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटरजवळील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, प्रथम येणाऱ्यास  प्राधान्य या तत्वावर त्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे’, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.चे संचालक सिद्धार्थ शिरोळे, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर उपस्थित होते.

दर वर्षी महोत्सवा दरम्यान होणारे प्रकाशचित्रप्रदर्शन हे रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या प्रकाशचित्रप्रदर्शनाचे हे सलग अकरावे वर्ष असून, या वर्षी ‘साथसंगत’ या संकल्पनेवर हे प्रदर्शन आधारलेले आहे. कोणताही कलाकार हा स्वरमंचावरून अर्थातच एकट्याने कधीच कलेचे सादरीकरण करत नाही. त्यांना दमदार साथ असते ती त्यांच्या बरोबर ‘साथसंगत’ करणाऱ्या कलाकारांची. मैफल यशस्वी होण्यात या साथसंगतीचे महत्त्व असाधारण आहे. सारंगी, हार्मोनियम, तबला, पखवाज, घटम, व्हायोलीन, ऑर्गन, मृदंगम, टाळ अशी वाद्ये साथीसाठी वापरली जातात. वर्षानुवर्षे ही वाद्य वापरून ज्यांनी आपले कान लाडावून ठेवले आहेत अशी काही कलावंत मंडळी या वर्षीच्या प्रकाशचित्र प्रदर्शनात आपल्याला भेटणार आहेत.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link