Next
‘मेडिकल टुरिझम क्षेत्रात भारत आघाडीवर’
प्रेस रिलीज
Thursday, August 09, 2018 | 04:59 PM
15 0 0
Share this story

आयबेक्समेडवर्ल्ड संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी शेख आझम, प्रवीण लुंकड, संजय भिडे, डॉ. श्रीकांत राजे, डॉ. प्रदीप महाजन व संजय टकले

पुणे : ‘उच्च कौशल्य असणारे डॉक्टर्स व वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ, इंग्रजी भाषेत संवाद साधण्याचे कौशल्य, अद्ययावत तंत्रज्ञान, समग्र उपचार पध्दतींची उपलब्धता आणि पाश्चात्य सेवांचा असलेला कमी खर्च यामुळे येत्या काळात मेडिकल टुरिझम क्षेत्रात भारत आघाडीवर असेल’, असे मत ट्रान्स एशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या मेडिकल टुरिझम विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप महाजन यांनी व्यक्त केले. 

आयबेक्स न्यु कन्सेप्टस प्रा.लि.तर्फे ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आयबेक्समेडवर्ल्ड डॉट कॉम’ या वैद्यकीय क्षेत्रातील माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे अनावरण एका कार्यक्रमात करण्यात आले. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

या कार्यक्रमाला ग्रँड मेडिकल टुरिझम आणि मेडिव्हिजन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीकांत राजे, आयबेक्स न्यु कन्सेप्टस प्रा.लि.चे संचालक शेख आझम, सध्याचे वर्ल्ड कार रॅली चॅम्पियन संजय टकले व आयबेक्सच्या प्रतिनिधी डॉ. नेहा शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी तीन आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार करण्यात आले. त्यामध्ये आयबेक्स न्यु कन्सेप्टसचा बीजिंग झाँगट्यो कंपनीसोबत टेक्नोलॉजी ट्रान्सफरसाठी, तर यिडबँग पोर्टलबरोबर मिडिया पार्टनर करार, स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्स मुंबईचा बीजिंग मेड रिट्रीट हॉस्पिटलबरोबर करार आणि ग्रँड मेडिकल टुरिझमचा चायना असोसिएशन फॉर लाईफ केअर बरोबर करार यांचा समावेश आहे.

‘आयबेक्स न्यु कन्सेप्टस’तर्फे ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आयबेक्समेडवर्ल्ड डॉट कॉम’ या संकेतस्थळाद्वारे योगा, आयुर्वेद, भारतात तयार होणारी वैद्यकीय उपकरणे, मेडिकल टुरिझम याबाबतचा माहितीसाठा असेल,ज्यामुळे भारत आणि इतर देशांदरम्यान आरोग्य सेवा क्षेत्रात संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.

डॉ. महाजन पुढे म्हणाले, ‘विकसित देशांमधील लोकांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी मेडिकल टुरिझम हे प्रवेशद्वार आहे. विकसित देशांमधील वैद्यकीय सेवांचा वाढता खर्च, वेगाने वृध्द होणारी लोकसंख्या यामुळे भारतात मेडिकल टुरिझम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परदेशी नागरिक भारतात कर्करोग चिकित्सा, हदयशस्त्रक्रिया, दंतचिकित्सा व सौंदर्यप्रसाधन चिकित्सा इत्यादींसाठी येत आहेत. कारण याचा खर्च भारतात त्या देशांच्या तुलनेने कमी आहे. २०१५ मध्ये चार लाख व्हिसा देण्यात आले होते, तर २०१७ मध्ये हा आकडा पाच लाखांवर गेला. २०२०पर्यंत मेडिकल टुरिझम या क्षेत्राची भारतातील व्याप्ती आठ बिलियन डॉलर्स इतकी होईल. सध्या इतर देशांतून भारतात वैद्यकीय चिकित्सेसाठी येणाऱ्या लोकांमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक महाराष्ट्र व तमिळनाडूमध्ये जातात.’ 

डॉ. श्रीकांत राजे म्हणाले, ‘एकीकडे चीनमध्ये झालेला विकास हा वाखाणण्याजोगा असला, तरी दुसरीकडे भारतीय डॉक्टर्सनी जगभरात आपल्या कौशल्याने नावलौकिक कमावले आहे आणि त्यामुळेच मेडिकल टुरिझम या क्षेत्राला चालना मिळत आहे. टुरिझम कंपन्यांनादेखील या क्षेत्रामुळे अधिक वाव मिळणार आहे. वैद्यकीय सेवांबाबत माहिती संकलन करण्यासाठी सुरू केलेल्या या संकेतस्थळाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.’

शेख आझम म्हणाले, ‘हे संकेतस्थळ भारतातील आयबेक्स न्यु कन्सेप्टस व बीजिंगमधील त्यांचे असलेले भागीदार आयबेक्स इंटरनॅशनल बिझनेस अॅंड कन्सल्टींग यांचा संयुक्त उपक्रम आहे. भारतात मेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी प्रत्येक वर्षी विविध देशांवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यामध्ये २०१९मध्ये चीन, २०२० व २०२१मध्ये युएई, ओमान, नायजेरिया व इजिप्त या देशांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या उपक्रमाला ‘इंडोओआयसी चेंबर ऑफ कॉमर्स’चे सहकार्य मिळणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Maneesha Lele About 227 Days ago
👍👍
1
0

Select Language
Share Link