Next
भिवंडी ‘मनपा’चे प्रभाकर भोईर यांचा स्वेच्छानिवृत्तीनिमित्त सत्कार
मिलिंद जाधव
Tuesday, November 13, 2018 | 12:19 PM
15 0 0
Share this article:



भिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील कासणे येथे राहणारे प्रभाकर रघुनाथ भोईर भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत होते. २३ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी अलीकडेच स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या निमित्ताने विशेष सोहळा त्यांच्या राहत्या घरी कासणे येथे नुकताच पार पडला. 

ते पालिकेत कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कामांवर उपस्थितांकडून या वेळी प्रकाश टाकण्यात आला. उपस्थितांनी भोईर यांचा सत्कारही केला. प्रभाकर भोईर यांनी त्यांचा प्रवास मनोगतातून व्यक्त केला. या वेळी आरपीआय सेक्युलर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ॲड. किरण चन्ने, भिवंडी लेबर फ्रंट युनियन सरचिटणीस संतोष चव्हाण, साहित्यिक जयवंत सोनावणे, मुख्य आरोग्य निरीक्षक हेमंत गुळवी, उत्तम जाधव, नितीन चव्हाण, गोविंद गंगावणे, संतोष जाधव, बी. के. भोईर, लेबर फ्रंट युनियन कार्याध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, जीवदास भोईर, पारसिक बँक सांगली शाखा व्यवस्थापक प्रमुख अनिल चव्हाण, नारायण चव्हाण, नंदकुमार सोष्टे, उपसरपंच गणपत पाटील, रवी जाधव, अरुण वाणी, शिवसेना विभागप्रमुख भगवान भोईर, भगवान गायकवाड, साहित्यिक जगदेव भटू ,चंद्रमणी जाधव, ॲड भावना वाघचौरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन भोईर, तसेच भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी, ग्रामस्थ, मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार भगवान भोईर यांनी मानले, तर सूत्रसंचालन शशिकांत चव्हाण यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search