Next
भिवंडी महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड
BOI
Wednesday, August 01 | 03:56 PM
15 0 0
Share this story

भिवंडी : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या आठवड्यात स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. ही निवड महापौर तथा पीठासीन अधिकारी जावेद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्य म्हणून काँग्रेसचे अंजुमन अहमद सिद्दिकी, परवेज अहमद सिराज अहमद, सिराज मोहम्मद मो. ताहीर, मोहम्मद वसीम मोहम्मद हुसेन अन्सारी, अन्सारी मोहम्मद हलीम, शिवसेनेचे बाळाराम मधुकर चौधरी, मदन कृष्णा नाईक, कोणार्क विकास आघाडीतर्फे विलास आर. पाटील यांची निवड झाल्याचे महापौर जावेद दळवी यांनी जाहीर केले. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उपमहापौर मनोज काटेकर, आयुक्त मनोहर हिरे, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, नगर सचिव अनिल प्रधान उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link