Next
पुण्यात सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, February 04, 2019 | 04:54 PM
15 0 0
Share this story

पुणे : प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली आणि गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘तू ही नजरों में... तू ही नजारों में’ हा विशेष कार्यक्रम पाच फेब्रुवारी २०१९ रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. सरस्वती, अंतर्नाद आणि महक या संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यात गायक जितेंद्र अभ्यंकर, अली हुसेन, गायिका मनीषा निश्चल, भाग्यश्री अभ्यंकर यांचे बहारदार गायन अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. संगीत संयोजन केदार परांजपे यांचे आहे. निवेदन सुलभा तेरणीकर करणार आहेत. प्रसाद गोंदकर, रमाकांत परांजपे, विक्रम भट, केदार मोरे, अभिजित भदे, विशाल थेलकर, विजू मूर्ती, दर्शना जोग, नीलेश देशपांडे व बाबा खान हे वाद्यांवर साथसंगत करणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link