Next
नवी रेनो ‘क्विड’ दाखल
प्रेस रिलीज
Friday, August 17, 2018 | 04:51 PM
15 0 0
Share this story

पुणे :  ‘रेनो’ या भारतातील अग्रणी युरोपियन कार ब्रँडने  आपल्या लोकप्रिय ‘क्विड’ या कारची नवीन श्रेणी बाजारपेठेत दाखल केली आहे. ही कार आठ वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध असून, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारी नवी ‘रेनो क्विड’ही कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय बाजारात दाखल करण्यात आली आहे. 

रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुमित साहनी म्हणाले, ‘छोट्या कार्सच्या श्रेणीत अडीच लाखांपेक्षा जास्त ग्राहक मिळवून, ‘क्विड’ने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ग्राहकांच्या सातत्याने बदलणाऱ्या आवडी-निवडी लक्षात घेऊन नियमित उत्पादनांमध्ये सुधारणा करून, आम्ही आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन ‘क्विड’ची निर्मिती केली आहे. नव्या ‘रेनो क्विड २०१८’ मध्ये डिझाईन्स आणि तांत्रिक नाविन्याचा समावेश असून, आम्ही ती परवडणाऱ्या किंमतीत ग्राहकांना देत असल्याने ही कार जास्त आकर्षक ठरली आहे. ‘क्विड’ची लोकप्रियता आणखी वाढावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, रेनो परिवारात आणखी ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

‘वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणाऱ्या नव्या ‘रेनो क्विड’ श्रेणीत एसयुव्हीपासून प्रेरणा घेऊन काही सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये सात इंची टचस्क्रीन मिडिया एनएव्ही सिस्टम, मागील कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेन्ट क्लस्टर, वन टच चेंज लेन इंडिकेट, रेडीओ स्पीडवर अवलंबून असणारे आवाज नियंत्रण आणि भार नियंत्रणासह प्रो-सेन्स सीटबेल्ट प्रीटेन्शनर्स या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वोत्तम वैशिष्ट्यांमध्ये 300 लिटर्सची बूट क्षमता, 180 मिमीचा ग्राउंड क्लीअरन्स, अर्गो-स्मार्ट केबिन, सामानासाठी मोठी जागा, अप्पर सेग्मेंट बॉडी डायमेन्शन्स, अंतर्गत जागा, सर्विस पार्ट्सच्या देखभालीचे मूल्य, प्रवास, हाताळणी आणि अन्य वैयक्तिक पर्यय यांचा समावेश आहे. या श्रेणीत पॉवर स्टेअरिंग, 3 आणि 4 स्पीड मॅन्युअल एसी, ओआरव्हीएम पॅसेंजर साईड, इंजिन इमोबीलायझर, ब्ल्यूटूथ आणि टेलिफोनीसह सिंगल डीन ऑडीओ, पुढील स्पीकर्स आणि 12 वॉल्ट पॉवरचे सॉकेट इत्यादी बाबींचा समावेश आहे’, असेही त्यांनी नमूद केले. 

‘रेनो क्विड २०१८’ श्रेणीवर कोणतेही अतिरिक्त मूल्य न लावता चार वर्षे किंवा एक लाख किमी (जे आधी पूर्ण होईल ते) त्याची वॉरंटी आणि रस्त्यावरील मदत देऊ करण्यात आली आहे. फेअरी रेड, प्लॅनेट ग्रे, मूनलाईट सिल्व्हर, आईस कुल व्हाईट, आउटबॅक ब्राँझ आणि इलेक्ट्रिक ब्ल्यू  अशा सहा आकर्षक रंगांमधून ग्राहकांना ‘नव्या रेनो क्विड’ची निवड करता येणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link