Next
‘सिस्का’तर्फे इमर्जन्सी बल्ब्स, लँटर्न्स दाखल
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 03:37 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सिस्का एलईडी या तंत्रज्ञानामध्ये उत्कृष्ट नाविन्य आणणाऱ्या व एलईडी लायटिंगमध्ये प्रवर्तक असलेल्या कंपनीने एलईडी लायटिंग उत्पादनांमध्ये सिस्का एलईडी ‘इमर्जन्सी बल्ब्स’ व ‘इमर्जन्सी लँटर्न्स’ दाखल करून आपल्या कॅटलॉगमध्ये दोन नव्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचा समावेश केला आहे. नव्याने दाखल केलेले एलईडी लाइट्स विशेष आहेत व ‘सिस्का’तर्फे एलईडी श्रेणीतील अशी पहिलीवहिली उत्पादने आहेत.

विशेषतः उन्हाळ्यात वीज जाण्याचे प्रकार होतात तेव्हा सिस्का एलईडी इमर्जन्सी बल्ब्स व इमर्जन्सी लँटर्न्स उपयुक्त ठरतात. सिस्का इमर्जन्सी बल्ब्स व सिस्का इमर्जन्सी लँटर्न्स पर्यावरणपूरक आहेत व दुहेरी वापर करता येण्यासारखे आहेत. रेट्रो बी२२ बेसमुळे इमर्जन्सी बल्ब्सचा वापर प्रकाश मिळण्यासाठी नेहमीचे बल्ब म्हणून करता येऊ शकतो किंवा वीज गेल्यास हा दिवा तातडीने लागतो. या बल्बमध्ये रिचार्जेबल बॅटरी असते व बल्ब सुरू असताना अचानक वीज गेल्यास वीजपुरवठा अखंडित सुरू राहावा म्हणून ती आपोआप वापरली जाते.  

सिस्का एलईडी इमर्जन्सी लँटर्न्स उजळावेत म्हणून त्यामध्ये ब्राइट एलईडी असतात व ते वापरण्यास सोपे असतात. इमर्जन्सी लँटर्नमध्ये आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. मोबाइल फोनलाही वीज पुरवता यावी म्हणून फाइव्ह इन वन चार्जिंग केबल व वीज नसताना संगीत ऐकता यावे म्हणून कार्ड स्लॉट यासह, यूएसबी आउटपुटचा वापर करता येऊ शकतो. सातत्याने वीज जात असलेल्या ठिकाणी व घरात इन्व्हर्टर नसल्यास इमर्जन्सी लँटर्न्स अतिशय उपयोगी आहेत. अडचणीच्या वेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हे उत्पादन उपयुक्त असून, त्यांना पोर्टेबल इमर्जन्सी लँटर्न्सचा वापर करता येऊ शकतो. सिस्का एलईडी इमर्जन्सी लँटर्न्स अन्य आकर्षक मॉडेलमध्येही उपलब्ध असून, त्यामध्ये सौरउर्जेवरील कंदिलांचाही समावेश आहे.

इमर्जन्सी वापरासाठी आटोपशीर रिचार्जेबल बॅटरी ऊर्जा, ७डब्ल्यूI, इमर्जन्सी पॉवर ४डब्ल्यू, नियमित होल्डर बेसमध्ये साजेसे बी२२/ई२७, इमर्जन्सी पॉवर कालावधी (बॅटरीवर): ३.५ तास, बॅटरी अधिक टिकण्याच्या दृष्टीने, बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग करणे थांबवले जाते, ही सिस्का एलईडी इमर्जन्सी बल्बची विशेष वैशिष्ट्ये आहेत.

३६ ब्राइट एलईडींचा समावेश व वापरण्यास सुलभ व सोयीचे, ब्राइट लाइट १० तासांपर्यंत, डिम लाइट २४ तासांपर्यंत वापरता येतो. वीज गेल्यावर आपोआप सुरू होतात. चार्जिंग डिव्हाइससाठी यूएसबी आउटपुट व फाइव्ह इन वन यूएसबी चार्जिंग केबलचा समावेश, एमपीथ्री म्युझिक व एसडी कार्ड प्लेबॅक आणि एफएम/एएम व एयूएक्स पोर्ट, ही सिस्का एलईडी इमर्जन्सी लँटर्न्सची विशेष वैशिष्ट्ये आहेत.  

या विषयी बोलताना सिस्का समूहाचे संचालक राजेश उत्तमचंदानी म्हणाले, ‘आम्ही एलईडी श्रेणीमध्ये नवी व नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. ग्राहकांना सर्वोत्तम लायटिंग उत्पादने देणे, हे आमचे उद्दिष्ट असते. इमर्जन्सी बल्ब्स व लँटर्न आमच्या ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन तयार केले आहेत.’

सिस्का एलईडी घर व कार्यालय यासाठी आंतरराष्ट्रीय एलईडी लायटिंग पर्याय उपलब्ध करते. सिस्का एलईडीच्या ६००हून अधिक नाविन्यपूर्ण उत्पादनांमध्ये विविध प्रकारचे बल्ब, सीलिंग फॅन, स्पॉट लाइट्स, ट्युबलाइट्स, इमर्जन्सी लाइट्स, इलेक्ट्रिकल अॅक्सेससरीज व स्ट्रिप लाइट्स यांचा समावेश आहे. निरनिराळ्या प्रकारच्या व लहान-मोठ्या आकारांत, कलर टेम्परेट, वॅट पॉवर व प्रकार यामध्ये उपलब्ध असलेले एलईडी दिवे जागतिक प्रमाणके व दर्जा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तयार केले आहेत. सर्व उत्पादनांचे डिझाइन आकर्षक असून, त्यामुळे घराला किंवा कार्यालयाला पूर्णतः नवे रूप प्राप्त होते.

‘सिस्का एलईडी’विषयी :

सिस्का एलईडी ही आधुनिक, भविष्यात्मक व अतिशय परिवर्तनशील श्री संत कृपा समूहाची प्रमुख कंपनी आहे. सिस्का एलईडीने ऊर्जाक्षम व पर्यावरणपूरक लायटिंग उत्पादनांना चालना देऊन शाश्वत पर्यावरणाची निर्मिती करण्यावर कमालीचा भर दिला आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करत असताना, ‘सिस्का’तर्फे विविध प्रकारची स्पेशलाइज्ड ग्रीनफिल्ड इको-फ्रेंडली एलईडी लायटिंग उत्पादने दिली जातात. हे दिवे सीएफएलपेक्षा ७० ते ८० टक्के कमी वीज वापरतात. उत्तम प्रखरता, प्रकाशाचे समान वितरण, उच्च कार्यक्षमता व सक्षम आरओआय ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ‘सिस्का’ आपल्या उत्पादनांमध्ये विश्वासार्हता, टिकाऊपणा, सुरक्षितता व गुणवत्ता देऊ करते आणि त्यांची उपयुक्तता निवासी, व्यावसायिक यापासून औद्योगिक व आउटडोअर वापरापर्यंत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link