Next
पराठे, पुऱ्या, रोटी, धिरडी, थालीपीठ + सूप्स, स्टार्टर्स, मॉकटेल्स, बार्बेक्यू
BOI
Friday, November 17 | 11:31 AM
15 0 0
Share this story

पौष्टिक आणि पोटभरी आहार अशी पराठे, धिरडी, थालीपिठांची ओळख आहे. जयश्री कुबेर यांनी हा आहार चविष्ट नि लज्जतदार बनवला आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक जवळ ठेवले, तर रोज वेगवेगळे प्रकार केले तरी वर्षभरही नव्या चवीचे पदार्थ खायला मिळतील. पराठ्यांचे ५५ प्रकार, विविध पुऱ्या, डोसे, आंबोळी, घावन, धपाटे, फुलके, भाकरीच्या कृतीही पुस्तकात आहेत.

त्यांच्या दुसऱ्या पुस्तकात सर्व ऋतूत बनवता येतील अशा ४६ सूप्सच्या कृती दिल्या आहेत. शिवाय मांसाहार प्रेमींसाठी वेगळे प्रकार सांगितले आहेत. सार, शोरबा, कढण आदींच्या कृतीही आहेत. वेलकम ड्रिंक्सची नुसती नावे वाचली, तरी तोंडाला पाणी सुटावे. स्टार्टर्समध्येही व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारांत पाककृती आहेत. आणखी वेगळे हवे असेल, तर बार्बेक्यूही करून पाहता येतील.
 
प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १६०  
किंमत : १२० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link